संयुक्त राष्ट्रसंघाच्या UN75 विश्व शांती मोहिमेचे सदस्य म्हणून डॉ. सुधाकर मडावी यांची निवड
प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

संयुक्त राष्ट्रसंघ ही आंतरराष्ट्रीय संस्था असून आंतरराष्ट्रीय कायदा , आंतरराष्ट्रीय सुरक्षा , आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवी हक्क आणि जागतिक शांतता यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करते .
संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेला पंचाहत्तर वर्ष होत आहे. हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाचे 75 व्या वर्धापन दिनाचे वर्षे आहे .संयुक्त राष्ट्रसंघाच्या वर्धापन दिनानिमित्ताने जागतिक पातळीवर यू.एन. 75 विश्वशांती अभियान राबविण्यात येत आहे. त्या विश्वशांती मोहिमेचे सदस्य म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाकडून , राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. सुधाकर मडावी यांची निवड करण्यात आली आहे.
जगाच्या कल्याणासाठी , जागतिक शांततेसाठी व मानवी हक्कासाठी मी संयुक्त राष्ट्रसंघासोबत उभा आहे , तसेच जागतिक संविधान / संसद असोशियन यू.एस.ए.चे आंतरराष्ट्रीय सदस्य तथा विश्व शांतिदूत डॉ. सुधीर तारे यांचे मार्गदर्शनाखाली विश्व शांती मोहिमेत काम करणार आहे असे मत डॉ. सुधाकर मडावी यांनी व्यक्त केले.
नक्षलग्रस्त , दुर्गम , आदिवासी भागात कार्यरत गावखेड्यातील सर्वसामान्य व्यक्तीची संयुक्त राष्ट्रसारख्या संस्थेत आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वशांती मोहिमेत सदस्य म्हणून झालेल्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.