जिवती तालुक्यात अवैध दारू विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

0
308

जिवती तालुक्यात अवैध दारू विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

प्रतिनिधी/रमाकांत कांबळे

चंद्रपूर जिल्ह्यांची दारू बंदी होऊन चार वर्षे पूर्ण झाली तरी जिवती शहरात व तालुक्यात ठिकठिकाणी ” तालुक्याची प्रगती झाली एका फोन वर दारू आली असे चित्र आहे ” शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री केली जात आहे,जिवतीला तेलंगणा राज्याची सिमा लागून असल्यामुळे तिकडून शहरात दारू येत असेल काय अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे, तरी मात्र प्रशासना कडून डोळ्यावर हात ठेवण्याची भूमिका घेतली जात असल्यामुळे अवैध रित्या दारू विक्री जोमात सुरू असल्याचे चित्र परिसरात आहे. प्रशासन मात्र गावाबाहेर होणाऱ्या दारू तस्करीवर थातुरमातुर कारवाई करून आपण केलेली कारवाई योग्य असल्याची वरीष्ठ अधिकाऱ्यांना भासवून येथील अट्टल दारू विक्रेत्याकडे प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे. ही सामान्य नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. व मद्यपी आपली हौस भागवण्यासाठी ठरवून दिलेल्या किंमती पेक्षा दुप्पट पैसे देऊन दारू विकत घेत आहेत, अश्यातच दारू विक्रेता दुप्पट नफा कमावित असल्याने नीट उभा होत असलेला सुखी संसाराचा डोलारा पुन्हा कोसळायला सुरुवात होणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून शहरात चलते – फिरते लायसन्स असलेले बार कधी बंद होणार आहे, व अवैध दारू विक्री करणाऱ्यावर प्रशासन कधी तरी कठोर कारवाई करणार का ? असे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here