शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणीबाबत जिल्हास्तरीय समितीची सभा

0
353

चंद्रपूर,दि. 31 ऑगस्ट: शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणीबाबत एकूण 9 प्राप्त प्रकरणे समितीसमोर ठेवण्यात आली होती. त्यापैकी समितीने निर्णय घेऊन 5 प्रकरणे मंजूर करुन मदत देण्याकरिता पात्र ठरविली तर 4 प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस विभागामार्फत शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी बाबत नियंत्रण समितीची दर महिन्यात आयोजित करण्यात येणारी मासिक सभा 31 ऑगस्ट 2020 रोजी जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विनय राठोड, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे गजेंद्र मेश्राम, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस.एन.झा, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रमोद गेडाम तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी,कृषी विभागाचे प्रतिनिधी, सर्व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीत ज्या शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळेच आत्महत्या केली. त्यांना प्रशासनातर्फे मदत करण्यात येईल असे निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांनी स्पष्ट केले. तसेच इतर कारणाने आत्महत्या करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना सदर लाभ मिळणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या वारसास मदत देण्याबाबत आढावा या बैठकीत घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here