कळंब येथील नगर सेवक राजुभाऊ पड्डा यांचे दु:खद निधन
समीर मलनस

कळंब नगर पंचायतीचे युवा नगर सेवक मा. श्री. राजूभाऊ पड्डा यांचे काल सायंकाळी ५ वाजता नागपुर येथे रुग्णालयात उपचार दरम्यान हृदयविकाराने दुःखद निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ४o वर्ष होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, आई, वडील तसेच आप्त परिवार आहे. आज कळंब येथील उत्तरवाहिनी येथे त्यांचा शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला. त्यांचा शांत व मनमिळावू स्वभाव असल्याने त्यांच्या निधना मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.