चंद्रपूर तुकुमच्या शहीद भगतसिंग परिसरात साजरा झाला जडीबुटी दिन , अनेकांची उपस्थिती 

0
672

चंद्रपूर तुकुमच्या शहीद भगतसिंग परिसरात साजरा झाला जडीबुटी दिन , अनेकांची उपस्थिती 

चंद्रपूर (विदर्भ ) -किरण घाटे –

पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान संघटन,लॉ कॉलेज योगा क्लास व विश्वकर्मा फर्निचर चंद्रपुर यांचे वतीने स्थानिक भगतसिंग चौक तुकुम येथील परिसरात नुकताच आयुर्वेदाचार्य स्वामी बालकृष्णजी महाराज यांच्या जन्म दिवसाचे अाैचित्य साधुन जडीबुटी दिवस साजरा करण्यात आला. या वेळी जडीबुटी वृक्षाचे वितरण करण्यात आले.सदरहु कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विजयराव चंदावार जिल्हा प्रभारी भारत स्वाभिमान यांनी विभुषित केले हाेते .तर प्रमुख पाहुणे म्हणून शरद व्यास,जिल्हा संघटन मंत्री पतंजली योग समिती रमेशजी ददगाल जिल्हा उप प्रभारी पतंजली योग समिती अशोक संगिडवार जिल्हा महामंत्री पतंजली योग समिती रमेश कासुलकर जेष्ठ नागरिक पतंजली योग समितीचे व तालुका पदाधिकारी सुधाकर शिरपूरकर,सोनी,प्रकाश कसलेवार उपस्थित होते.या कार्यक्रमात विजय चंदावार,शरद व्यास,रमेश ददगाल यांनी जडी बुटी व योग प्राणायाम मुळे शरीराचे सारे रोग कशाप्रकारे दुर होतात त्याबद्दल माहिती दिली.जडी बुटी वितरण नंतर पतंजली योग समितीच्या वैजयंती गहुकर व त्यांचे टीमने योगा न्रूत्य प्रस्तुत केले. अल्पोपहारने कार्यक्रमाची सांगता झाली..कार्यक्रमाला पतंजलीचे पदाधिकारी व कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित हाेते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here