आष्टा येथे पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण कार्यक्रम साजरा

0
436

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत आष्टा येथे आज वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला. सद्यस्थितीत सिमेंटचे वाढते जंगल,कमी होत चाललेले जंगल,आणि निसर्गाची झपाट्याने होत असलेली हानी यामुळे तापमान वाढ होत आहे.त्यामुळे अनेक पर्यावरणीय संकट येत आहेत.दिवसेंदिवस पर्यावरणाचा तोल ढासळत आहे.तापमानवाढ रोखण्यासाठी वृक्ष लागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे.त्यामुळे दरवर्षी ग्रामपंचायत मार्फत वृक्षारोपण केले जाते.यावर्षी सुद्धा शाळा अंगणवाडी,रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच श्रीमती किरण डाखरे,माजी सरपंच हरीश जी ढवस,ग्रामसेवक मनोज मूढवा सर, vstf चे तालुका समन्वयक धर्मेंद्र घरत,प्राथमिक शाळेतील कोवे सर,ठाकरे सर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास दिवसे,रोजगार सेवक सुरेश दिवसे,ग्रा.पं कर्मचारी आशिष बल्कि आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here