८० हजाराची दारू व सुगंधित तंबाखू नष्ट

0
517

८० हजाराची दारू व सुगंधित तंबाखू नष्ट

मुक्तीपथ तालुका चमू व गाव महिला संघटनाचे धाडसत्र

सिरोंचा (गडचिरोली), सुखसागर झाडे
सिरोंचा तालुक्यातील मोयाबिनपेठा येथे मुक्तीपथ तालुका चमू व गाव संघटनेच्या महिलांनी अहिंसक कृती करीत ८० हजाराची विदेशी दारू व सुगंधित तंबाखू नष्ट केला आहे. गावात पुन्हा अवैध दारू विक्री करनार नाही अशी हमी दारूविक्रेत्यानी दिली.
मोयाबिनपेठा येथे दारू विक्रीस बंदी असताना मात्र गावातील एक दारू विक्रेता चोरट्या मार्गाने दारू विक्री करीत असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली. त्यानुसार मुक्तीपथ तालुका चमू व गाव संघटनांनी अहिंसक कृतीचे नियोजन करीत सदर दारू विक्रेत्याच्या घराची पाहणी केली असता विविध प्रकारची विदेशी दारू व सुगंधित तंबाखूचे डब्बे असा एकूण ८०हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य, तंमुस अध्यक्ष ,गाव संघटनेच्या महिला व गावातील लोकांसमक्ष पुन्हा अवैध व्यवसाय करणार नाही, विक्री केल्यास कारवाई करावी. अशी हमी त्या विक्रेत्यांना दिली. त्यामुळे गावकरी व पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेत संपुर्ण मुद्देमाल नष्ट करीत पुन्हा विक्री केल्यास पोलिसांच्या स्वाधीन करु असे ठणकावून सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here