नवेगाव येथे वाघाच्या हल्लात गुराखी जागीच ठार ; विरुर स्टे. वनपरिक्षेत्रातील घटना

0
374

नवेगाव येथे वाघाच्या हल्लात गुराखी जागीच ठार ; विरुर स्टे. वनपरिक्षेत्रातील घटना

राजुरा (राजू झाडे) : तालुक्यातील विरुर (स्टे) वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या नवेगाव येथे एक इसमावर एकाकी वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात सदर इसम जागीच ठार झाला आहे.
मृत इसमाचे नाव श्री वासुदेव कोंडेकर असून अंदाजे वय 45 च्या जवळ आहे. वासुदेव कोंडेकर हे ४ वाजताच्या सुमारास पोळा असल्यामुळे रोजपेक्षा लवकर आपली गुरे घेऊन घराकडे निघाले. रस्त्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने एकाकी त्याच्यावर हल्ला करून त्यांना जागीच ठार केले. या अगोदरही परिसरातील घटनामुळे जनतेत वाघाची दहशत पसरली आहे. याकडे वन प्रशासनाने जातीने लक्ष देऊन जनतेला भयमुक्त करणे अभिप्रेत असून जनतेतून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. परिसरातील संपूर्ण जनतेने सतर्क राहणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here