घुग्घुस शहरातील दिव्यांग बांधवांनी नगरपरिषद व पोलीस स्टेशनला निवेदने देत विविध समस्यांबाबत केली चर्चा
आज दि. ७ नोव्हेंबर २०२३ मंगळवार रोजी रोखठोक प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतिने संस्थापक अध्यक्ष महेशभाऊ हजारे यांच्या ऊपस्थितीत घुग्घुस शहरप्रमुख इसरारभाई सिद्धिकी, ऊपशहरप्रमुख दादामियाभाई शेख, सदानंद चांदेकर यांनी नगर परिषदेचे अधिकारी यांना विविध समस्या बाबत निवेदन दिले.
दिव्यांग बांधवांच्या समस्या ऐकुन घेऊन चर्चा करताना रोखठोक प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे पोलीस स्टेशन ला भेट देऊन दिव्यांग बांधवांच्या समस्यांवर चर्चा केली.
घुग्घुस पोलीस स्टेशन चे एपिआय यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानतांना रोखठोक प्रहार दिव्यांग संघटनेचे सर्व पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.