राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्यव्यापी आंदोलन

0
497

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्यव्यापी आंदोलन

तहसीलदारा मार्फत पाठविले शासनाला निवेदन

7 डिसेंबरला विधानभवनाला करणार घेराव

राजुरा : ओबीसी समाजाच्या संवैधानिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ व समवीचारी ओबीसी संघटनांचे राजुरा तहसील कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, समन्वयक प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे, कार्याध्यक्ष डॉ. खुशालचंद्र बोपचे, महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेत्रुत्वात करण्यात आले.
ओबीसी समाजाच्या प्रामुख्याने राज्य आणि केंद्र शासन यांच्याकडे प्रस्तावित करणाऱ्या मागण्या मांडल्या. या मधे ओबीसी समाजाची 2021 मधे होऊ घातलेली जातीनीहाय जनगणना केंद्र सरकार करीत नसेल तर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यात जातीनीहाय जनगणना करून ओबीसी समाजाला न्याय द्यावा. मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये. ज्या जिल्ह्यांमध्ये ओबीसीना गडचिरोली 6, चंद्रपुर 11, यवतमाळ 14, नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, रायगड 9 टक्के या जिल्ह्यात वर्ग तीन व चार मधील पदाकरीता आरक्षण आहे. अशा जिल्ह्यात ओबीसीना 19 टक्के आरक्षण देण्यात यावे. 100 टक्के बिंदुनामावली केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार त्वरित सुधारीत करण्यात यावी. ओबीसी समाजातील विध्यार्थीकरीता स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावे. महाज्योती मधे भटके व विजेएनटी मधून दोन अशासकिय पदे भरण्यात यावी. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपये मंजुर करण्यात यावे व वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ, श्यामराव पेजे इतर मागास वर्ग आर्थिक विकास महामंडळ, पुन्यश्लोक अहिल्याबाई शेळीमेंढी महामंडळ भरीव तरतूद करण्यात यावी. व बारा बलूतेदारासाठी आर्थिक महामंडळ स्थापन करून आर्थिक तरतूद करण्यात यावी. भटक्या जमातीतील प्रवर्गातील समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे. एसी, एसटी प्रमाणे ओबीसी शेतकऱ्यांना शंभर टक्के सवलतीवर राज्यात योजना सुरू करण्यात यावी. सर्व अभ्यासक्रम शंभर टक्के शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी. स्वाधार योजना लागू करण्यात यावी. या इतरही मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. तसेच 7 डिसेंबर 2020 ला विधानसभवनाला लाखोंच्या संख्येत ओबीसी समाजबांधव घेराव घालतील असा इशारा यावेळी देण्यात आला. सवीता गंभिरे पुरवठा निरीक्षक यांनी निवेदन स्वीकारले. माजी आमदार अँड. वामनराव चटप, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, शिवसेनेचे नगरसेवक राजू डोहे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तालुका अध्यक्ष संतोष देरकर, महासचिव बादल बेले,कार्याध्यक्ष कपिल इद्दे, सहसचिव संदीप आदे, प्रसिध्दी प्रमुख निखिल बोन्डे, पुंडलिक वाढई, दिनेश पारखी, डी.आर.गौरकार, नागेश उरकुडे, सुधाकर रासेकर, राष्ट्रीय ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष अडवे, उपाध्यक्ष मधुकर मटाले, रामरतन चापले, कोशाध्यक्ष साईनाथ परसुटकर, सचिव किसन बावणे, राजू चिंचोलकर, भास्कर वाटेकर, संदीप कोन्डेकर, बाबूराव पहानपटे, प्रदीप पायघण, श्रीकृष्ण वडस्कर, प्रभाकर जूनघरे, संजय गोखरे, पुरुषोत्तम गंधारे, दिलीप नीमकर, स्वप्नील पहानपटे, नितीन जयपुरकर, केतन जूनघरे, रतन काटोले, मनोहर बोबडे, प्रदीप बोबडे आदींसह मोठ्या संख्येत ओबीसी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here