गडचांदूर मधील काँग्रेसचे अल्पसंख्याक शहर अध्यक्ष वाजिद शेख यांचा कार्यकर्त्यांसह युवा स्वाभिमान पार्टी मध्ये प्रवेश

0
510

गडचांदूर मधील काँग्रेसचे अल्पसंख्याक शहर अध्यक्ष वाजिद शेख यांचा कार्यकर्त्यांसह युवा स्वाभिमान पार्टी मध्ये प्रवेश
आज दिनांक ०२/११/२०२० रोजी गडचांदूर येथे सर्वपक्षीय तरुणांचा व इतर कार्यकर्त्यांचा युवा स्वाभिमान पार्टीमध्ये प्रवेश.
⭕ सविस्तर वृत्त असे की ,
युवा स्वाभिमान पार्टीमध्ये नुकतेच प्रवेश केलेले सुरज ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये गडचांदूर येथील काँग्रेस पक्षाचे शहर अल्पसंख्यक अध्यक्ष वाजिद शेख यांनी कार्यकर्त्यांसह प्रवेश केला ,
याशिवाय सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येने युवा स्वाभिमान पार्टी चे नेतृत्व श्री रवि राणा व सौ नवनीत राणा यांचे वर विश्वास ठेऊन व त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन युवा स्वाभिमान पार्टी मध्ये प्रवेश केला .
सुरज ठाकरे यांना नुकतेच आमदार श्री रवी राणा यांनी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पद देऊन पक्ष वाधी ची जबाबदारी दिली व त्यांचे धडाडीचे करू हे सर्व परिचित असल्याने आता चंद्रपूर मध्ये गाव तिथे शाखा हे अभियान ते राबवित आहेत , या अंतर्गत बरेचशे लोक पक्षामध्ये प्रवेश घेणार असल्याचे त्यांनी या ठिकाणी सांगितले .
प्रस्थापितांना जबरदस्त हादरा सुरज ठाकरे त्यांच्या कामाच्या शैलीतून देत आले आहेत आणि आता त्यांना रवी राणा सारखे खंबीर नेतृत्व लाभल्याने त्यांची लोकप्रियता अधिकच वाढत आहे असे दिसत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here