मेस्काे मुस्लिम एज्युकेशनल साेशल अँड कल्चरल आर्गनायजेशनच्या पुढाकाराने चंद्रपूरात पार पडले भव्य रक्तदान शिबिर! अनेकांचा शिबिरात सहभाग!

0
524

मेस्काे मुस्लिम एज्युकेशनल साेशल अँड कल्चरल आर्गनायजेशनच्या पुढाकाराने चंद्रपूरात पार पडले भव्य रक्तदान शिबिर! अनेकांचा शिबिरात सहभाग!

किरण घाटे

प्रेम, दया, शांती आणि त्याग हा महम्मद पैंगबर यांचा संदेश डाेळ्यांसमाेर ठेवून तदवतचं सामाजिक बांधिलकीचे नाते जाेपासत गत १२वर्षापासुन सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणां-या चंद्रपूरातील मेस्काे मुस्लिम एज्युकेशनल साेशल अंड कल्चरल आर्गनायजेशन संस्थेच्या वतीने ईद -ऐ-मिलाद या सणाच्या औचित्य साधुन काल शुक्रवार दि.३०आँक्टाेबरला (सकाळी ९ते दुपारी ३वाजेपावेताे) येथील स्थानिक जटपूरा गेट समिपच्या जिल्हा परिषद शाळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले हाेते.सदरहु रक्तदान शिबिरात एकंदर ९५ रक्तदान दात्यांनी स्यंस्फुर्तीने आपला सहभाग नाेंदविला हाेता अशी माहिती या सामाजिक संस्थेचे जहीर भाई काझी यांनी आज दिली.
दरम्यान कालच्या शिबिराला शासकीय रुग्णालयाचे व वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष सहकार्य लाभले.शिबिराला डाँ .हुमने , डाँ .हजारे , डाँ. साने डाँ . साेनकुसरे व स्थानिक शासकीय रुग्णालयाचे पथक उपस्थित हाेते.अनेकांनी उपरोक्त संस्थेनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची मुक्त कंठाने प्रशंसा केली. सदरहु शिबिर यशस्वि करण्यासाठी उपराेक्त संस्थेचे अध्यक्ष अँड.फरहत बेग ,सचिव हकीम काँचवाला ,हमिद लालानी , रहेमान पटेल अब्दुल भाई , निसार जेसिआय , डाँ .एजाज शेख , कलिमभाई , इम्रान अली , अमान काझी , राजिक खाँन , शब्बीर पठाण , शादाबा चिनी तथा मजहर टिचर आदिंनी अथक परिश्रम घेतलेे .रक्तदान शिबिराला मेस्काे मुस्लिम एज्युकेशनल साेशल अंड कल्चरल आर्गनायजेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित हाेते .शहरातील अनेक गणमान्य व प्रतिष्ठित नागरिकांनी या शिबिराला काल दुपारी भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here