घुग्घुस शहरातील मून्नूरुकापू समाजातर्फे पारिवारीक स्नेहमिलन

0
337

घुग्घुस शहरातील मून्नूरुकापू समाजातर्फे पारिवारीक स्नेहमिलन

घुग्घुस येथील दि.२३ एप्रिल २०२३ रविवार रोजी मून्नूरुकापू समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित “पारीवारीक स्नेहमिलन-२०२३” या कार्यकर्माचे अध्यक्ष तसेच भाजप जिल्हाध्यक्ष मा.श्री.देवराव भोंगळे उपस्थित राहून समाजबांधवांच्या आनंदात सहभागी झाले.
याठिकाणी मुन्नूरूकापू समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच वरीष्ठ मान्यवरांचा सत्कार करण्यात आले. याप्रसंगी मून्नूरुकापू समाजबांधवांना संबोधित करताना समाजाच्या उन्नतीसाठी भारतीय जनता पार्टी आपल्या कायम सोबत आहे, असा विश्वास दिले.
मून्नूरुकापू समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष शंकर सिद्दम यांनी देवराव भोंगळे यांचा मार्गदर्शनाचे आभार मानले.
तसेच घुग्घुस शहरातील तेलुगु व सर्व समाजाला घुग्घुस वरुन बस सेवा करीमनगर ये-जा करिता निवेदनातून पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना मागणी करुन ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात देवराव भोंगळे यांच्या कडे सोपविले.
कारण घुग्घुस शहर औद्योगिक शहर असुन येथे पुष्कळ समाजातील नागरीक असुन बरेच करीमनगर चे नागरीक आहे,घुग्घुस ते करीमनगर बस सेवा सकाळी व सायंकाळी ७ ते ८च्या दरम्यान मून्नूरुकापू समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्थानी केली.
तसेच मून्नूरुकापू समाजातील काही विद्यार्थी एम.बी.बी.एस.पास व पदवीधर विद्यार्थीचे सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे समाजाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय मिसलवार, शहर अध्यक्ष रवि पुरोड्डीकर आवर्जून उपस्थित होते.

यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी ग्रा.पं. सदस्य साजन गोहने,समाजाचे शहर अध्यक्ष गोपाळ तोटा,सचिव कंदुनुरी तिरुपती, सल्लागार तिरुपती, चंदु बलीशेट्टी, माजी अध्यक्ष मोगली लक्काकुला, व्यंकटेश तोटा, माजी सचिव लक्ष्मण कोप्पुला, श्रीनिवास बहादूर, श्रीकांत, रामु रतन, रापेल्ली ओदल, पोगला रामलु, रंगय्या पुरेली, राजम पुरेली, तिरुपती पुरेल्ली,दिपक मिसाला,रवी मिसाला,शंकर तोटा या कार्यक्रमात समाजाचे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने समाजबांधव व परिसरातील नागरिक उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here