युबी कलेक्शन ला लागलेल्या आगीची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी, अग्निशमन दलाला केल्या महत्वाच्या सूचना

0
438

युबी कलेक्शन ला लागलेल्या आगीची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी, अग्निशमन दलाला केल्या महत्वाच्या सूचना

 

 

 

शहरातील कुंभार मोहल्ला येथे असलेल्या युबी कलेक्शन या कपड्याच्या दुकानाला लागलेल्या आगीची आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली असून अग्निशमन दलला आगीवर पुर्णतः नियंत्रण मिळविण्याच्या सूचना केल्या आहे.

 

 

आज रात्रोच्या सुमारास कस्तुरबा मार्गावरील युबी कलेक्शन या कपड्याच्या दुकानाला अचानक आग लागली. याची माहिती अग्निशमन दलला मिळताच त्यांची वाहने घटनास्थळी दाखल झालीत. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला सदर दुकाना सभोवताल नागरिकांची घरे असल्यामुळे आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविण्याच्या सूचना यावेळी आ. जोरगेवार यांनी केल्या अग्निशमन दलला केल्या आहे. आग पूर्णतः आटोक्यात आली याची खात्री होई पर्यंत आग विझविण्याची मोहीम सुरूच ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here