स्नेहा फूड & फीड कंपनी वर आम आदमी पार्टीने केली कारवाईची व ५ कोटी दंड देण्याची मागणी…
०८ जानेवारी २०२२ रोजी चंद्रपूर मार्गावरील अंतूर्ला गावा लगतच्या स्नेहा फूड & फीड प्रा.ली. कंपनी मध्ये करंट लागून तीस वर्षीय कामगार हरगुन कुमार सैनी याचा मृत्यू झाला. या मजुराला मानवीय दृष्टिकोनातून मदत करायला पाहिजे होती परंतु या मजुराच्या शवाला शासकीय रुग्णालयात ठेऊन अधिकाऱ्यांनी पळ काढला. या घटनेवरून असे स्पष्ट होते की स्नेहा फूड ही कंपनी सुरक्षा नियमांचे पालन करत नाही त्यामुळे मजुरांच्या जीवाला हानी होते. सदर करंट लागण्या मागच कारण कंपनी द्वारा योग्य त्या सुरक्षा नियमांचे पालन केले नसल्यामुळे कामगार वर्गाचा जीव धोक्यात आहे.
या गोष्टीची दखल घेत आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा जिल्हाधिकारी चंद्रपूर, पोलिस अधीक्षक चंद्रपूर, सुरक्षा अधिकारी चंद्रपूर, पोलिस स्टेशन घुग्घुस, स्नेहा फूड & फीड प्रा.ली. कं. ला निवेदन देण्यात आले व मृतकाच्या परिवाराला भरपाई म्हणून ५० लाख देण्यात यावे व परिवारातील एका सदस्यास एक नौकरी देण्यात यावी. सोबतच कंपनीने सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे कमीत कमी ०५ कोटी रुपयांचे दंड ठोठावण्यात यावे. जेणेकरून अशा प्रकारच्या घटना येणाऱ्या काळात कंपनीमध्ये होणार नाही. ही मागणी पूर्ण न झाल्यास आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा देण्यात आला.
यावेळी घुग्घुस आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, घुग्घुस शहराध्यक्ष अमित बोरकर, बल्लारशा शहर अध्यक्ष रवी पप्पुलवार, आसिफ शेख, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, विकास खाडे, आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, सागर बिऱ्हाडे, दिनेश पिंपलकर, निखिल कामतवार , सारंग पिदुरकर, सोनू शेट्टियार, स्वप्नील आवळे, अभिषेक तालापेल्ली व अन्य उपस्थित होते.