अल्ट्राटेक फाऊंडेशन आवाळपूर व्दारा भव्य रक्तदान शिबिर

0
434

अल्ट्राटेक फाऊंडेशन आवाळपूर व्दारा भव्य रक्तदान शिबिर

 

आवाळपूर : आजच्या धावपळीच्या युगात, अपघात आणि महारोगाचे प्रमाण वाढले असून रक्ताची आवश्यकता जास्त प्रमाणात भासत आहे. आवश्‍यकतेनुसार रक्ताचा साठा कमी पडत असते, रक्ताचा साठा कमी पडू नये व कुणाला तरी जीवनदान मीळावे हे ध्येय समोर ठेवत अल्ट्राटेक कम्युनिटी
वेलफेअर फाऊंडेशन यांच्या वतीने व जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शीबीराचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उदघाटन अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर, विदयुत वरखेडकर मॅडम यांचा हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एस.डी.ओ.राजुरा सम्पत खलाटे, तहसीलदार कोरपना महेंद्र वाकलेकर, अल्ट्राटेक चे युनिट हेड श्रीराम पी.एस., महाव्यवस्थापक संजय शर्मा, संदीप देशमुख, सौदीप घोष व कर्नल दीपक डे यांची उपस्थिती होती. मुख्य अतिथींचे स्वागत आदिवासी पारंपारिक नुत्य घुसाडी नुत्य आणि बुक्के व टिलक लावुन करण्यात आले. घुसाडी नृत्य हे सर्वांचे मन मोहुन घेणारे ठरले.

अप्पर जिल्हाधिकारी, विदयुत वरखेडकर, एस.डी.ओ. सम्पत खलाटे, तहसीलदार महेंद्र वाकलकर यांना अल्ट्राटेकचे युनिट हेड, श्रीराम पी.एस. यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व बांबूपासून बनविलेल्या शोभेच्या वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला विशेष म्हणजे सभोवतालील गावातील महिला बचत गटानी आपल्या हातानी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन लावण्यात आले, यावेळी क्रिष्णा महिला बचत गट सांगोडा, धनलक्ष्मी महिला बचत गट, बिबी, जीजाऊ महिला बचत गट नांदा, समृद्धी महिला बचत गट आवारपूर, ऊन्नती महिला बचत गट नोकारी व बांबू हस्तकला बीबी असे सहा महिला बचत गट उपस्थित होते. तसेच अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाऊंडेशन ने मागील वर्षात केलेल्या कार्याचा तपशील ब्यानर द्वारा प्रदर्शनीत करण्यात आला होता. शेवटच्या टप्प्यात मुख्य अतिथी अप्पर जिल्हाधिकारी, विदयुत वरखेडकर मॅडम व युनिट हेड, श्रीराम पी.एस. यांच्या हस्ते वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले.

या भव्य रक्तदान शिबिरात १८६ रक्तदात्यांची नोंद झाली असून १७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये सभोवतालील गावकरी, ठेकेदारी कर्मचारी, कंपनी कर्मचारी व विशेष म्हणजे महिला यांच्या सुद्धा समावेश होता.

या कार्यक्रमाला बोलतांनी मुख्य अतिथी अप्पर जिल्हाधिकारी विदयुत वरखेडकर यांनी या कार्यक्रमाची मनसोकत स्तुती केली. व त्यांनी सर्व नागरिकांना रक्तदान करण्यासाठी तसेच महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यात सांगितले. व याच कार्यक्रमावेळी मतदान पूर्न निरीक्षण संघ उपस्थित होते, तरी सर्वांनी त्यांना सहकार्य करावे असे सुद्धा मुख्य अतिथी यांनी आवाहन केले. अल्ट्राटेकचे युनिट हेड यांनी अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर, एस.डी.ओ. राजुरा व तहसीलदार कोरपना तसेच सर्व रक्त दात्यांचे आणि गावातील सरपंच, उपसरपंच तसेच सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानले.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता कर्नल दिपक डे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तर सतीश मिश्रा, सचिन गोवारदिपे, संजय ठाकरे व देविदास मांदाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here