तालुक्यात लंप्पी या रोगाचा प्रादुर्भाव, घोडेवाहित पशु वैद्यकीय अधिकाऱ्याचे दुर्लक्ष
सावली : बंडू मेश्राम

सावली तालुक्यात अनेक ठिकाणी लंप्पी या पशु रोगाचा प्रादुर्भाव असल्याने शेतकरी चिंतीत आहे. घोडेवाही 40 ते 50 बैल आणि गायी या रोगाने पीडित आहेत. जनावरांना दाद येणे, फोड होणे अशी लक्षणे असून केरोडा पशुवैद्यकीय दवाखाना येथे कार्यरत असलेले डाँ मशाखेत्री यांचे दुर्लक्ष असल्यामुळे गावातील अनेक जनावर उपचारापासून वंचित आहेत. मागील एक वर्षांपासून सदर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने शिबीर किंवा लसीकरण केले नाही. अनेक दिवसांपासून त्याना फोन करून सुद्धा घोडेवाहित आलें नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीत आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. शेतीचे कामासाठी अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे गावातील अनेक शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करा किंवा शेतकऱ्यांना सेवा द्या अशी मागणी केली जात आहे.