कोरपना तालुक्यातील तामसी घाटातील ४० हजार ब्रास अवैध रेती उपसाचा पर्दाफाश – एसडीओंचे तत्काळ चौकशीचे आदेश

0
13

कोरपना तालुक्यातील तामसी घाटातील ४० हजार ब्रास अवैध रेती उपसाचा पर्दाफाश – एसडीओंचे तत्काळ चौकशीचे आदेश

चंद्रपूर – कोरपना तालुक्यातील तामसी रेट घाटातून तब्बल ४०,००० ब्रास रेतीचा अवैध उपसा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर गदा आल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. या प्रकरणाची बातमीद्वारे दखल घेतल्यानंतर राजुरा उपविभागीय अधिकारी (एसडीओ) यांनी तत्काळ चौकशीचे आदेश तहसीलदार कोरपना यांना दिले आहेत.

रेती तस्करीचे बिंग उघडण्याची भीती?

सदर तामसी रेट घाटातून शासनाने केवळ ६१८४ ब्रास रेती उपसण्याची परवानगी दिली होती. मात्र, संबंधित कंत्राटदाराने याच्या अनेकपट अधिक म्हणजे जवळपास ४०,००० ब्रास रेतीचा उपसा केल्याचा आरोप आहे. त्यामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास तर झाला आहेच, पण शासनाच्या महसुलालाही मोठा फटका बसला आहे.

तहसीलदारांचे दुर्लक्ष?

या अवैध रेती उपशाबाबत विविध सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेत्यांनी लेखी तक्रारी दिल्यानंतरही तहसीलदार कोरपना यांनी दुर्लक्ष केल्याचे आरोप होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घाटाचे मोजमाप करण्यास ते सातत्याने टाळाटाळ करत होते, अशी माहिती समोर आली आहे.

तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांचे संशयास्पद मोजमाप

तहसीलदारांनी २८ मे २०२५ रोजी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना मोजमापाचे आदेश दिले होते. हे मोजमाप ३ जून रोजी पार पडले, मात्र त्यातील प्रामाणिकतेवर गंभीर शंका व्यक्त करण्यात आली आहे. काही तक्रारदारांनी स्पष्ट केले की, बेंचमार्क हटवले गेले होते, आणि १० एकरहून अधिक भूभागात मोठ्या प्रमाणावर उत्खनन स्पष्ट दिसून येत होते. मात्र तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी घाटधारकाला वाचविण्यासाठी मोजमाप चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्रशासनाकडून घाटधारकाला संरक्षण?

या प्रकरणात प्रशासन आणि घाटधारक यांच्यातील साठगाठ असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, स्थानीय नागरिक, कार्यकर्ते आणि नेत्यांनी सातत्याने तक्रारी करूनही योग्य ती कारवाई झालेली नसल्याने तहसीलदारांच्या विरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा तक्रारकर त्यांनी दिला आहे.

तहसीलदार नॉट रिचेबल

प्रतिनिधीनीं तहसीलदार कोरपना यांचेशी कारवाई व प्रतिक्रिया घेण्याकरिता मोबाईल द्वारे अनेकदा संपर्क केला असता तहसीलदारांनी कॉल रिसीव केला नाही तालुक्यातील अनेकांचे तहसीलदार फोन रिसीव्ह करीत नसल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here