वनविभाग आलापल्ली अंतर्गत वनपरिक्षेत्र चामोर्शी व छत्रपती शिवाजी महाराज युवा मंडळ राजनगट्टा च्या वतीने राजनगट्टा येथे वन्यजीव सप्ताहाचे आयोजन

0
365

वनविभाग आलापल्ली अंतर्गत वनपरिक्षेत्र चामोर्शी व छत्रपती शिवाजी महाराज युवा मंडळ राजनगट्टा च्या वतीने राजनगट्टा येथे वन्यजीव सप्ताहाचे आयोजन

चामोर्शी । सुखसागर झाडे

संपूर्ण देश भरात 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीवांचे मानवी आयुष्यातील महत्व व वन्यजीवांची सद्या स्थितीतील परिस्थिती विषयी जनजागृती करून वन्यजीवांचे संरक्षण करण्याकरिता वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे.  याचेच औचित्य साधत राजनगट्टा या गावात सुद्धा वनविभाग व छत्रपती शिवाजी महाराज युवा मंडळ, राजनगट्टा च्या वतीने  वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी राजनगट्टा वनसमितीचे अध्यक्ष आनंदरावजी कोहळे तर प्रमुख मार्गदर्शक म्हनून श्री आर. एम. नरुले क्षेत्र सहाय्यक भाडभिडी हे होते. सोबतच प्रमुख पाहुणे म्हणून देवाजी भांडेकर, लांजेवार वनरक्षक आमगाव, निमसरकार वनरक्षक, कुळमेथे वनरक्षक मारोडा,कोरवते वनरक्षक राजुर , गुडधे वनरक्षक कर्कापल्ली, नैताम वनरक्षक हळदवाही, त्याचप्रमाणे वसंतजी कोहळे सदस्य वनसमिती राजनगट्टा उपस्थित होते.
कार्यक्रमाकरीता गावातील जेष्ठ नाकरिक, युवक, महिला व समस्त गावकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज पर्यावरणाचे संवर्धन करायचे असल्यास वन्यजीवांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे, कारण वन्यप्राणी हे पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहे.असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक नरुले यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालन अनुप कोहळे यांनी तर आभार उमेश भांडेकर यांनी मानले. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन छत्रपती शिवाजी महाराज युवा मंडळ राजनगट्टा च्या पदाधिकाऱ्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here