युवा नेते सुरज ठाकरे बनले युवा स्वाभिमान पार्टीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष !

0
580

युवा नेते सुरज ठाकरे बनले युवा स्वाभिमान पार्टीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष !

त्यांचेवर हाेताेयं सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव !

चंद्रपूर किरण घाटे :- चंद्रपूर जिल्ह्यातील लोकप्रिय तडफदार युवा नेते सुरज ठाकरे यांना आजच प्रहार मधुन (प्रहार जनपक्षातुन)बाहेर काढल्यानंतर कुठल्याही क्षणाचा विलंब न हाेता आजच्याच तारखेत युवा स्वाभिमान पार्टीने त्यांचेवर त्यांचे कामगार क्षेत्रातील भरीव व उल्लेखनिय कामगिरीचे मुल्यमापन करुन (त्यांचेवर) चंद्रपूर जिल्हा युवा स्वाभिमान पार्टीची जिल्ह्याध्यक्ष पदाची महत्वाची धुरा त्यांचे खांद्यावर दिली असल्याचे खात्रीलायक व्रूत्त नुकतेच प्राप्त झाले आहे .दरम्यान या संदर्भात सुरज ठाकरे यांचेशी साेमवारी दुपारी भ्रमनध्वनी वरुन या प्रतिनिधीने संपर्क साधण्यांचा प्रयत्न केला असता त्यांचेशी संपर्क हाेवू शकला नाही . राजूरा विधान सभा क्षेत्रात त्यांनी कामगारांच्या विविध न्याय मागण्यांसाठी आज पावेताे अनेक आंदोलने उभारली आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांचे व्यक्तीगत योगदान माेलाचे ठरले असुन सुरज ठाकरे यांचे कामगिरी मुळे जिल्ह्यातील युवा कार्यकर्त्यांची फार माेठी फाैज त्यांचे पाठीमागे आजही उभी आहे .काेराेना संकटातही संकटात अडकलेल्यांना रुग्णांना त्यांनी मदतीचा हात दिला आहे .या शिवाय कामगारांच्या समस्यां साेडविण्यासाठी ते सातत्याने झटले असुन संपूर्ण कार्यकर्त्यांत त्यांची एक तडफडार युवा मित्र म्हणुन आेळख आहे .त्यांचे या आजच्या नव्या नियुक्तीची बातमी कानावर पडताच अनेकांनी त्यांचे व्हाँटसअप , भ्रमनध्वनी व प्रत्यक्ष भेटुन अभिनंदन केले आहे .युवा स्वाभिमान पार्टीचे अध्यक्ष आमदार रवि राणा असुन त्यांनी सुरज ठाकरे या युवा नेत्यावर विश्वास दर्शवित त्यांना हे महत्वाचे(या पार्टीचे)अध्यक्ष पद दिले असल्याची चर्चा चंद्रपूरच्या कार्यकर्त्यांत जाेरात सुरु आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here