सिबतैन कादरी यांना भारतीय मानवीय व उत्कृष्टता पुरस्कार

0
413

सिबतैन कादरी यांना भारतीय मानवीय व उत्कृष्टता पुरस्कार

गडचांदूर प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील रहिवासी सिबतैन कादरी यांना इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस नवी दिल्लीतर्फे भारतीय मानवीय व भारतीय उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कोविड -19 महामारीत समाज सेवेसाठी हा त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.सिबतैन कादरी हे तमिळनाडू येथील भारतीदास विश्वविद्यालय तिरुचिरापल्ली येथे एमएससी पर्यावरण विज्ञान व प्रौद्योगिकी छात्र असून 6 महिन्यांसाठी यांची सेमिस्टर प्रोजेक्ट साठी निवड झाली होती.कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर कादरी यांनी समाजसेवा सुरू ठेवली आणि आचार्य डॉ.एन.मणिमेकलै कोविड-19 कॉन्सीलच्या समुपदेशकासह विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या 25 इतर राज्यांतील फसलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी महत्त्वपूर्ण भुमिका बजावली.एवढेच नाही तर त्यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी येथील आदिवासींच्या वस्तीत राहणाऱ्या वंचित लोकांना मदत करण्यासाठी डॉ.अजिंक्य रमेश चकोर यांच्या “अन्नमित्र: फीड इनिशिएटिव्ह बाय कॉलेज ग्रॅजुएट्स” ला व्हॉट्सअ‍ॅप संपर्काद्वारे 6,014 रूपये गोळा करून दिले.त्यांच्या मदतीने 20 घरांना आठवड्याचे रेशन पाठविण्यात आले.या लॉकडाऊनमध्ये,भारतातील विविध केंद्रीय आणि राज्य विद्यापीठांद्वारे आयोजित निबंध लेखन,कवीता वाचन,स्लोगन लेखन,वादविवाद,क्विज आणि पोस्टर डिझाइनिंग अशा विविध स्पर्धा ऑनलाईन जिंकून पुरुस्कार रुपी मिळालेल्या पैशांतुन 25 टक्के पाथ फाऊंडेशन, गडचांदूरला गरजुंच्या मदतीसाठी दिले.तसेच हरयाणातील स्प्रेड स्माईल फाउंडेशन,सोनीपत वंचित मुलांना शिक्षण दिले जात आहे.कादरी यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप संपर्काच्या सहाय्याने या फाउंडेशनसाठी देखील 3051रुपय तथा भविष्यात स्पर्धेत जिंकलेल्या रकमेतून 25 टक्के देण्याचा निर्णय घेतला आहे.कादरी यांच्या अशा उल्लेखनीय सामाजिक कामांची दखल घेऊन इंडियन बुक ऑफ रेकॉर्डद्वारा नियुक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्ता डॉ.जिवीआरएसएस वरा प्रसादच्या निर्णयानुसार 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर 2020 रोजी पुरुस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.सिबतैन कादरी हे चंद्रपूर जिल्ह्यातील पहिले नागरिक असावे ज्यांचे नाव पहिल्यांदाच भारतीय बुक ऑफ रेकॉर्डमध्ये लिहिले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here