शिवापूर(बंदर) येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा

0
463

तालुका प्रतिनिधी✍🏻 आशिष गजभिये

 

चंद्रपूर/चिमूर :-    तालुक्यातील शिवापूर (बंदर) ग्रामपंचायत कार्यालय मध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला.या वेळी सरपंच सौ.मंजुषा नन्नावरे यांचे हस्ते स्वराजध्वजासह शिवशक राजदंडाची स्वराज्य गुढी उभारून त्यास नमन करण्यात आले. यावेळीं सामुहिक राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत गायन करण्यात आलं.

या प्रसंगी उपसरपंच आदित्य वासनिक यांनी उपस्थितांना ऐतिहासिक दिवसाचे महत्व विषद करत शिवाजी महाराजांच्या समाजहितकारक कार्याची उजळणी करून दिली.

या वेळी ग्रा.प.सदस्य विचित्रमनी रॉय,प्रमोद कामडी,अनुसया रामटेके,सपना सोनवाने, ग्रामसेवक मनोज सातपुते,परिचर विनोद देहारे रोजगार सेवक शालीक खुडसंगे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here