नगर पंचायतचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष, शहरात घाणीचे साम्राज्य,

0
460

नगर पंचायतचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष, शहरात घाणीचे साम्राज्य,
घनकचरा व्यवस्थापन कामाचा फज्जा,
नगरसेवक अमोल आसेकर यांचा आरोप,

(कोरपना)-शहर स्वच्छ व सुंदर राहण्याकरिता स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत १४ वित्त आयोगाच्या निधीतून घनकचरा व्यवस्थापनाचे काम करण्यात येत आहे परन्तु संबंधित ठेकेदाराकळून अंदाजपत्रक नुसार काम करीत नसून त्यावर नगर पंचायतीचे नियंत्रण नाही. यामुळे घनकचरा व्यवस्थापन कामाचा फज्जा उडाला असल्याने शहरात घाणीचे साम्राज्य दिसत असल्याने या योजनेचा मुख्य हेतूच असफल होत असल्याचा आरोप नगरसेवक अमोल आसेकर यांनी केला आहे.
कोरोना या विषाणूने देशभरात थैमान घातल्याने मोठ्या प्रमाणात या आजार पसरत असून कोरपना शहरात शिरकाव केला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे,या विषाणूवर आळा घालण्यासाठी शासन व प्रशासनाकळून मोठ्या प्रमाणात उपाययोजना करीत असून स्वच्छता या वर विशेष लक्ष देण्याची गरज आहे, त्याकरिता शहरातील नाली सफाई व परिसरात स्वच्छता असणे गरजेचे आहे परन्तु अनेक प्रभागातील नाली सफाई न झाल्याने घाण साचलेली आहे, तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता दिसत आहे, परन्तु वारंवार सूचना करून सुद्धा नगर पंचायत व संबंधित ठेकेदाराकळून दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे,
घनकचरा व्यवस्थापन कामावर नगर पंचायत चे नियंत्रण नसल्याने प्रभागातील स्वच्छतेची समस्या मार्गी लागत नसल्याचे दिसत आहे. प्रत्येक प्रभागातील नाली सफाई करून जंतूनाशक फवारणी करण्यात यावी, जनेकरून या विषाणूपासून व डासांपासून बचाव करता येतील या करिता आरोग्य विभागांनी या गंभीर समस्या कडे लक्ष देण्याची मागणी नगरसेवक अमोल आसेकर यांनी केली आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here