सुसंकृत, पारदर्शी, लोकाभिमुख व्यक्तिमत्त्वास समाज मुकला – आ. किशोर जोरगेवार

0
581

सुसंकृत, पारदर्शी, लोकाभिमुख व्यक्तिमत्त्वास समाज मुकला – आ. किशोर जोरगेवार

राजकारणातील सुसंकृत पणा जपत पारदर्शक कारभार करणार व्यक्तिमत्त्व म्हणून रमेशभाऊ कोतपल्लीवार यांची ओळख होती, 79 व्या वर्षी त्यांचे निधन झाले त्यांच्या जाण्याने राजकारणाची समज व दुरदृष्टी असलेला एक समाज प्रबोधनकार आम्ही गमावला असून समाज सुसंकृत, पारदर्शी, लोकाभिमुख व्यक्तिमत्त्वास मुकला असल्याची शोकसवेदना आमदार किशोर जोरगेवार यांनी माजी नगराध्यक्ष रमेश कोतपल्लीवार यांच्या निधणानंतर व्यक्त केली आहे.
रमेश कोतपल्लीवार यांनी तीन दा चंद्रपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष म्हणून यशस्वी काम पाहिले. नगर परिषदेतील दैनदीत जमा खर्चाचा हिशोब घेतल्या शिवाय ते नगर परिषदेतून जात नसे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा त्यांच्यावर अतिशय विश्वास होता. राजकारणासह धार्मिकतेचीही त्यांना आवड होती. आजचे चंद्रपूरचे प्रसिद्ध साई मंदिर उभे व्हावे यासाठी त्यांनी 50 वर्षा पाहिले ध्यास घेतला होती . जोपर्यंत साई बाबा मंदिर निर्माण होणार नाही तो पर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही असे प्रण त्यांनी घेतले त्यानंतर मंदिरकार्य पूर्ण होताच साई बाबा मंदीराचे सचिव म्हणूनही त्यांनी काही वर्षे काम पाहिले. आर्यवैश्य समाजातील उपवर – उपवधू परिचय मेळावे घेतले तसेच बाबा महाराज सातारकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित करत सामाजिक कार्यात आपले योगदान दिले. कोतपल्लीवार आणि जोरगेवार परिवारात नेहमी पारिवारिक सलोखा राहिला. कोतपल्लीवार परिवाराचा आशीर्वाद व माया नेहमीच आमच्यावर राहिली. मी जेव्हा कधी त्यांच्या भेटीला जायचो ते मला त्यांच्या कडे असलेलं वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किटे खाऊ घालायचे त्यांच्या अश्या अनेक आठवण सदैव स्मरणात राहणार आहे. चंद्रपूरच्या अनेक आमदारांचे ते निवडणूक प्रमुखही राहिले. माझ्या निवडणूकितही त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली होती मात्र त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते शक्य होऊ शकले नाही. त्यांच्या जाण्याने सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रासह माझे वैयक्तिकही नुकसान झाले.
या कठीण समयी कोतपल्लीवार कुटूंबियांना दुःखातून सावरण्याचे परमेश्वर बळ प्रदान करो अशी प्रार्थना करतो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here