परसोडा येथे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बैठक संपन्न

0
201

परसोडा येथे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बैठक संपन्न

शेतकऱ्यांना एकरी 20 ते 25 लाख रुपये व नौकरी द्या माननीय श्रीहंसराजजी अहिर केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार

आर. सि. सि. पी. एल. मुकुटबन (एम. पी. बिरला सिमेंट ) येथे सिमेंट उद्योग स्थापन होणार असून उद्योगाकरिता परसोडा, कोठोडा (बूज), कोठोडा (खुर्द), नवीन परसोडा, रायपूर, पांडुगुडा, चोपण व चनई (खुर्द) ता कोरपना येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहित होणार आहे. सदर शेतकऱ्यांना नियमानुसार आर्थिक मोबदला व रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता उपरोक्त नमूद गावातील शेतकऱ्यांची परसोडा येथे मा हंसराज अहीर यांनी प्राथमिक बैठक घेतली. ग्रामसभेच्या अहवालानुसार प्रत्येक शेतकऱ्यांना एकरी २० ते २५ लाख रु. मोबदला व रोजगार उपलब्ध व्हावा असा निर्धार या बैठकीतून करण्यात आला. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक भूमिका घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी संगितले. या बैठकीला श्री नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष भाजपा, श्री किशोर बावणे, श्री कवडू जरीले, श्री अमोल आसेकर, श्री संजय येरमे, सरपंच परसोडा, पद्माकर दगडी,गंगाधर कुंटावार,हरिदास पारखी उपरोक्त गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here