एसडीआे राेहन घुगे तथा तहसिलदार निलेश गाैंडच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर महसूल पथकांच्या एकाच महिण्यांत २०अवैध गाैण खनिज वाहनांवर कारवायां – १८लाखांपेक्षा अधिक दंड वसूल !

0
482

विशेष प्रतिनिधी/किरण घाटे

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात अंदाजे १५०ते २००रेती घाट आहे .या पैकी काही रेती घाटांचे लिलाव शासनाने या पूर्विच केले आहे . राज्यासह जिल्ह्यात महाभयानक काेराेनाने सावट घाेंगावत आहे .

अधिकारी व कर्मचारीवर्ग काेराेनाला आटाेक्यात आणण्यांसाठी दिवस रात्र प्रयत्नशिल असतांनाच याच संधीचा फायदा घेत दुसरीकडे अवैध रेती तस्करांनी आपले डाेके वर काढले हाेते .अवैध रेती चाेरीच्या तक्रारी जिल्हा प्रशासनास सातत्याने प्राप्त हाेत हाेत्या .अश्यातच गुप्त माहितीच्या आधारे चंद्रपूर तालुक्यात येथील सहाय्यक जिल्हाधिकारी राेहन घुगे , तहसीलदार निलेश गाैंड , नायब तहसीलदार , मंडळ अधिकारी , पटवारी व कार्यरत लिपिकांनी यशस्वीरित्या सापळा रचुन विविध रेती घाटांवर धाडी टाकुन मे महिण्यांत २०अवैध रेती वाहनांना रंगेहात ताब्यात घेतले .

या वाहनांवर दंडात्मक कारवायां करीत वाहन मालकांकडुन १८लाख तीन हजार पाचशे रुपये वसुल करुन ते खजीना दाखल केले असल्याचे व्रूत्त आहे .एफ्रिल महिण्यात याच महसुल पथकाने दाेन अवैध रेती वाहनांवर दंडात्मक कारवायां केल्या असुन खुद्द एसडीआे राेहन घुगे यांनी जिव धाेक्यात टाकुन काही रेती घाटांना अकस्माक रित्या भेटी दिल्या असल्याचे समजते .मागिल आठवड्यात पठाणपुरा मार्गावरील जमनजट्टी परिसरात एसडीआे घुगे यांनी स्वता सहा अवैध रेती वाहनांना रंगेहात पकडले हाेते .हे येथे उल्लेखिनय आहे .दरम्यान या कारवायांचे नागरिकांनी स्वागत केले असुन दंडात्मक कारवायां साेबतच अवैध रेती तस्करांवर पाेलिस कारवायां करण्यांची अपेक्षा आपल्या बाेलण्यांतुन सर्व सामान्य जनतेंनी व्यक्त केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here