ओबीसी आरक्षणाची पूर्ण अंमलबजावणी करण्याची मागणी

0
242

ओबीसी आरक्षणाची पूर्ण
अंमलबजावणी करण्याची मागणी

राष्ट्रपती ना दिले वंचित बहुजन आघाडी ने निवेदन

चिमूर

देशात ओबीसी समाजाला मंडल आयोग कमिशन नुसार दिलेल्या 27 टक्के आरक्षनाची उघडपणे पायमल्ली होत असल्याने त्या विरोधात आणि ओबीसी चे घटनादत्त आरक्षण वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी चे संस्थापक डॉ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शासनाला निवेदन देत असताना चिमूर तालुका वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष स्नेहदीप खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती यांना एसडीओ मार्फत निवेदन देण्यात आले

ओबीसींना पूर्ण आरक्षण द्यावे, ओबीसी विद्यार्थ्यांची 500 कोटी शिष्यवृत्ती पूर्वरत करण्यात यावी, मेडिकल मध्ये नीट परीक्षेच्या 11 हजार जागा डावलण्यात आल्याने त्या जागा रिक्त भरण्यात याव्या अश्या विविध मागणी संदर्भात निवेदन देण्यात आले

वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष स्नेहदीप खोब्रागडे यांच्या नेतृत्वात एसडीओ मार्फत राष्ट्रपती ना निवेदन देण्यात आले असून यावेळी प्रवीण गजभिये, श्रीदास राऊत जयदेव डांगे मोतीबाबू पिसे, जनार्धन खोब्रागडे हरिदास सोरदे, शालीक थुल रामदास राऊत शैलेश गायकवाड ज्ञानेश्वर नागदेवते विकास अंबादे आकाश राऊत वासुदेव गायकवाड आदी उपस्थित होते

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here