बल्लारपूर येथे भरदिवसा गोळीबार
(प्रा.महेन्द्र बेताल Impact 24 News प्रतिनिधी)

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्याच्या ठिकाणी आज दिनांक 8/8/2020 ला दुपारी 2 ते 2.30 च्या सुमारास भर दिवसा एफ डी सी एम च्या अलिकडे जुन्या बसस्टाप जवळ सुरज बहुरीया यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या.त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना चंद्रपूर येथे रुग्णालयात हलविण्यात आले.चंद्रपूर येथील पोलिस उपविभागीय अधिकारी मोक्याच्या ठिकाणी येऊन चौकशी करीत आहेत तसेच अज्ञात आरोपींचा कसून शोध घेत आहेत. पुढील तपास चंद्रपूर येथील पोलिस उपविभागीय अधिकारी तथा बल्लारपूर पोलिस करीत आहे.