कास्तकारांना बोनस रक्कम देण्याची आ. बंटी भांगडीयांची मागणी! मुख्यमंत्र्यांना सादर केले निवेदन!

0
532

कास्तकारांना बोनस रक्कम देण्याची आ. बंटी भांगडीयांची मागणी! मुख्यमंत्र्यांना सादर केले निवेदन!

चिमूर (चंद्रपूर), किरण घाटे : चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय आधारभूत दराने शेतकऱ्यांचा शेतमाल सक्षम संस्थांच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांची आधारभूत देय रक्कम मिळवून देण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला असता महत्प्रयासाने कोविड काळात शासनाने 42 कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असली तरी प्रति क्विंटल मागे 700 रुपये राज्य शासनाने घोषीत केलेला बोनस देणे अजूनही प्रलंबित आहे . लॉकडाऊन काळात शेती हंगाम सुरु झाला असता शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा व समस्यांचा सामना करावा लागत असल्याने चिमूर विधान सभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांनी तात्काळ दखल घेत चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रलंबित बोनस देण्याची मागणी केली आहे. एव्हढेच नाही तर त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक निवेदन पाठविले आहे .

चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी दि महाराष्ट्र स्टेट ऑफ कॉपरेटिव्ह फेडरेशन लि मी .या सक्षम संस्थेने आधारभूत दराने धान खरेदी केली होती परंतु राज्य शासनाने धान खरेदीची रक्कम व बोनस देण्यास विलंब केल्याने कोरोना काळात बळीराजा हवालदील झाल्याने अनेक अडचणींना सामोरे जात होता तेव्हा शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमदार भांगडीया यांनी लक्ष देवून शासनाला वारंवार पत्रव्यवहार केला शेवटी दि ७मे च्या दरम्यान 42 कोटी 88 लक्ष 74 हजार 666 रुपये शासनाने धान खरेदी ची मूळ रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली .
आ. भांगडीया यांच्या अथक प्रयत्नातुन यश आले असून कोरोना काळात मदत मिळवून दिली असली तरी शेतकऱ्यांचे हक्काचे बोनस देणे मात्र शिल्लक ठेवले आहे .प्रति क्विंटल 700 रुपये प्रमाने दिनांक १२ मार्च २०२१ नंतरच्या २२९५९०.२९ क्विंटल खरेदी धानाचे अंदाजे १६.०७ कोटी रुपयांचे बोनस थकीत आहे. सध्याची स्थिती कोरोना लॉक डाऊन असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत अडकला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय आधारभूत दराने खरेदी केलेल्या धान मालाची नोंदणी नुसार शेतकऱ्यांना तातडीने बोनस देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून आ. भांगडीया यांनी नुकतीच केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here