वणी(खु.)येथे अण्णा भाऊ साठे जयंती साजरी
प्रतिनिधी गोविंदा वाघमारे

मुक्ता साळवे बहुउद्देशीय महीला मंडळ,वणी (खु)द्वारा आयोजित साहीत्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांची 100 वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.
सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून मा. केशव गिरमाजी,माजी पं. समिती सदस्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचा सत्कार शाल ,सीरीफल देऊन करण्यात आला व शेवटी मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटक बार्टीचे समतादूत बालाजी मोरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष वणी ग्रा.पं.चे उपसरपंच मा. दत्ता कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. शाहीर अंकुश मोरे,मा.पुंडलीक गिरमाजी सरपंच, पोलिस पाटील मा. पंढरी कांबळे, माजी पं. समिती सदस्य सौ. पार्बताबाई गवाले इ. मान्यवर विचारपिठार प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्थाविक मा. अंकुश मोरे यांनी केले .त्यानंतर कार्यक्रमाचे मार्गदर्शक बार्टीचे समतादुत बालाजी मोरे यांनी आपल्या भाषणातून ‘आण्णा भाऊ साठे यांचे जिवन व साहीत्य ‘ याविषयावर प्रकाश टाकला. त्यानंतर आपल्या भाषणाच्या शेवटी आजच्या महिलांनी आण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील स्वाभिमानी स्त्रीयांपासून आदर्श घ्यावा,असा सल्ला दिला.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा. शाहीर येरेकर यांनी केले. यावेळी गावातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या युवक युवतींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर पुरुष, महीला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यश्वीतेकरीता मुक्ता साळवे बहुउद्देशीय महीला मंडळाच्या महिलांनी परिश्रम घेतले.