शिंधित अवैद्य दारूविक्रीचा महापूर* *शिंधि ठरत आहे अवैद्य दारू विक्रीचे केंद्र*

0
552

*शिंधित अवैद्य दारूविक्रीचा महापूर*

*शिंधि ठरत आहे अवैद्य दारू विक्रीचे केंद्र*

राजुरा- राजुरा तालुक्या अंतर्गत असलेल्या शिंधित मोठ्या प्रमाणात अवैद्य दारू विक्री सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.सध्या स्थितीत चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येत वाढत आहे.मृत्यूचा आकडा देखील मोठ्या प्रमाणात वाढतो आहे.अशा स्थितीत शिंधित दारू विक्रीमुळे आजू भोवतालच्या खेड्यातील मध्यपी मोठ्या संख्येने येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचे चिन्ह दिसत आहे.गावाची शांतता सुव्यवस्था धोक्यात आली असून.आमचं कोण काय वाकड करणार या तोऱ्यात अवैद्य विक्रेते वागत आहे.काही दिवसांपूर्वी कारवाई होऊन सुद्धा कसलास धाक दारु तस्करांवर नसल्याचे दिसत आहे.गावात येणाऱ्यांची संख्या मोठी असून त्यांच्या संपरकामुळे गावात अनेकांना ताप देखील असून टेस्ट केल्यास कोरोना प्रादुर्भाव वाढण्याचे चिन्ह दिसत आहे.अवैद्य दारू विक्रीकडे पोलीस विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here