भारत स्वाभिमान संघटनेचे विमलजी काष्ठीयांची प्राणज्याेत मालवली

0
580

भारत स्वाभिमान संघटनेचे विमलजी काष्ठीयांची प्राणज्याेत मालवली

चंद्रपूर, किरण घाटे  : चंद्रपूरला योगगंगा आणणारे तथा भारत स्वाभिमान संघटनेचे जेष्ठ सदस्य चंद्रपुर जिल्ह्याचे भीष्म पितामह विमलजी काष्ठीया यांचे शुक्रवारला रात्रो १२-३० वाजता चंद्रपूरातील डाँ .कुबेर यांचे रुग्णालयात वयाच्या ७२ व्या वर्षी उपचारा दरम्यान निधन झाले. चंद्रपुर नगरीसह अतिदुर्गम भागातील राजुरा तालुक्यात त्यांनी य़ोगाची गंगा आणुन अनेकांना (योगाचे )धड़े दिले आहे.
त्याच्या जाण्याने पतंजली परिवाराचे फार माेठे नुकसान झाले असुन राजुऱ्यात काष्ठीया यांनी ब-याच कार्यक्रमातुन पतंजलीच्या कार्यकर्त्यांना अमुल्य व माेलाचे मार्गदर्शन केले आहे. ते एक शांत व मनमिळावु स्वभावाचे हाेते .त्यांचे निधनाची बातमी आज जिल्हाभर पसरताच
राजुरा पतंजली योग समीती तसेच पतंजलीच्या (चारही) संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या सह अनेकांनी शाेक संवेदना व्यक्त करीत त्यांना आपली भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित केली .विमलजी काष्ठीया यांचे निधनाने पतंजली समितीत फार माेठी पाेकळी निर्माण झाली असुन ती कदापिही भरुन निघणारी नाही अश्या शब्दात पतंजलीच्या नागपूर निवासी सहज सुचलच्या जेष्ठ मार्ग दर्शिका मायाताई काेसरे पतंजली राजुरा गृपचे एम. के. सलोटे, मेघाताई धोटे, पुंडलीक उराडे, मिलींद गड्डमवार, शुभम मुने, सरोज हिवरे, वंदना खरवडे, अलका गंगशेट्टीवार, नलिनी झाडे, पुष्पा गिरडकर, कृतीका सोनटक्के, अरुना गावत्रे, अनिल चौधरी, सोनल चिडे, शरद खरवडे यांनी आपला दुखवटा व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here