गोंडपिपरी तालुक्यात लसीचा तुटवडा

0
573

गोंडपिपरी तालुक्यात लसीचा तुटवडा

गोंडपिपरी (सुरज माडूरवार) : कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण तालुक्यातील प्रत्येक स्वास्थ केंद्रात एक दा झाली. त्यानंतर आठवडाभर लसीकरण मोहीम बंद होती. कोविडशील्ड लसीचा पुरवठा झाल्यानंतर दि.३ सोमवारी ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरित सुरवात करण्यात आली. तेव्हा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आव्हानाला साथ देत कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याकरिता तालुक्यातील शेकडो नांगरिकांनी गर्दी केली. मात्र ६० डोस एवढाच लसीचा साठा उपलब्ध झाल्याने शेकडो नागरिकांना घरी परतवावे लागल्याने हिरमोड झाला. पुन्हा लसीचा साठा कधी उपलब्ध होणार..? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्या नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोस ६ ते ८ आठवड्यानंतर घेणे गरजेचे आहे.मात्र त्यांनाही कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दुसऱ्या डोस ची प्रतीक्षा आहे.

“जिल्ह्यावरून लसीचा पुरवठा जसा होत आहे तसा नागरिकांसाठी आम्ही साठा उपलब्ध करीत आहो. लवकरच जिल्ह्यावरून मोठ्या प्रमाणात लस येणार असून ग्रामपंचायती व आशा वर्करद्वारे नागरिकांना कळवण्यात येईल.”
डॉ प्रणित पत्रीवार
वैधकीय अधिकारी (धाबा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here