विशालसाठी मदतीचा आेघ सुरुचं…

0
1253

विशालसाठी मदतीचा आेघ सुरुचं…

युवा नेता अजय दुर्गेच्या आवाहनाला दिला अनेकांनी प्रतिसाद

चंद्रपूर, किरण घाटे : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील चिराेली येथील मुळ रहिवाशी असलेला विशाल खाेब्रागडेवर सध्या मंचेरियल येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असुन त्याची प्रक्रूती आता ठिक असल्याची माहिती आज (रविवारी) सकाळी चंद्रपूर शहरातील यंग चांदा ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे प्रमुख अजय दुर्गे यांनी भ्रमनध्वनी वरुन या प्रतिनिधीशी बाेलतांना दिली .विशालची आर्थिक परिस्थिती फारच बिकट असुन त्यांनी रुग्णालयांतुन आपले जिवलग मित्र अजय दुर्गे यांना एक संदेश पाठवून त्यात माझे प्रक्रूतीसाठी काही तरी करा हाे ! मला व माझे कुटुंबियांना येथील रुग्णालयाचा खर्च परवडण्यासारखा नाही असे नमुद (संदेशात) केले हाेते .मित्रत्वाचे नाते जपतं अजय दुर्गे यांनी आपल्या जिवलग मित्र विशालसाठी सढळ हस्ते मदत करा असा एक संदेश शहरातील काही व्हाँटसअप ग्रुप वरुन प्रसारीत केला हाेता. बघता बघता दाेन दिवसात (आता पावेताे) ४५हजार पेक्षा अधिक रक्कम जमा झाली असुन ती रक्कम विशाल कडे पाठविण्यात आलेली आहे .काेराेनाग्रस्त विशालसाठी अजुनही मदतीचा आेघ सुरु असल्याचे अजय दुर्गे यांनी आज सांगितले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here