आवाळपुर नांदाफाटा बनतोय कोरोना हॉटस्पॉट

0
1138

आवाळपुर नांदाफाटा बनतोय कोरोना हॉटस्पॉट

15 लोकांच्या मृत्यूने लोकांमध्ये भीतीचे वातावरण

नांदाफाटा परिसरात ‘स्वतंत्र कोविड तपासणी केंद्राची’ ची मागणी

आवाळपुर, नितेश शेंडे : देशभरात कोविडची दुसरी लाट पसरत असून याचा परिणाम आता ग्रामीण भागावर ही दिसून येत असून चंद्रपूर जिल्ह्यात औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदाफाटा आवाळपुर परिसरात सध्या कोरोनाचा चांगला धुमाकूळ पहायला मिळत असून जवळपास 150 च्या वर रुग्ण या परिसरात असल्याची माहिती आहे. मागील काही दिवसात 15 रुणांचा मृत्यू झाल्याने सुद्धा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील नागरिक कोविड च्या नियमांचे सर्रास उल्लंघन करीत असल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
कोविड विषयीचा नियम पालन करण्यासाठी आवाळपुर नांदाफाटा ग्रामपंचायत वारंवार लोकांना सूचना करीत असताना लोकांकडून नियमांचे सर्रास होणाऱ्या उल्लंघणासाठी स्थानिक प्रशासनाचा कमकुवतपना व लोकांची कोविडविषयीची भीती जबाबदार असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा प्रशासनाने वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे गरजेचेआहे अन्यथा परिसरात कोविडचा मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरात लोकांकडून नियंमांचे पालन होत असून दोन्ही गावता मोठ्याप्रमाणात या आजाराचे लक्षण असताना अनेक लोकं स्थनिक डॉक्टरांच्या माध्यमातून थातुरमातुर उपचार करून घरीच राहत असल्याने कुटुंबातील इतर सदस्यांना परिसरातीही इतर नागरिकांना सुद्धा या आजाराचा संसर्ग होण्याचा घटना घडत आहे.
अनेक रुग्ण हे गृहविलीगीकरणात असतानाही बाहेर फिरत असल्याने व त्यांचे नियम पाळत नसल्याने परिसरात कोरोना वाढ होताना दिसून येत आहे.

परिसरात आरोग्य यंत्रनेचे दुर्लक्ष – परिसरात 150 चा वर रुगनांना कोविडची लागण असताना आरोग्य यंत्रणा मात्र सुस्त असल्याचे बघावयास मिळत असून यामुळे परिस्थिती मात्र हाताबाहेर जात असल्याचे निदर्शनास येत आहे. आरोग्य यंत्रनेणे या समस्ये कडे गांभीर्याने लक्ष पुरविणे गरजेचे आहे.

आवाळपूर नांदाफाटा परिसरात स्वतंत्र कोविड तपासणी केंद्राची मागणी – अल्ट्राटेक सारखा मोठा सिमेंट उद्योग असल्याने परिसरात येणारे बाहेरील लोक याचबरोबर मागील 15 दिवसात आवाळपुर नांदाफाटा परिसरात वाढती कोविड ची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नांदाफाटा येथे स्वतंत्र कोविड तपासणी केंद्र देण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here