लोकमान्य टिळक स्मृती व अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी ऑनलाइन पद्धतीने साजरी।

0
301

लोकमान्य टिळक स्मृती व अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी ऑनलाइन पद्धतीने साजरी।

 

चांदा शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित जनता महाविद्यालय, चंद्रपूर येथे संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. अशोकभाऊ जिवतोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.सुभाष यांचे मार्गदर्शनात उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचे कडून मिळालेल्या पत्रानुसार आज दि. 1 ऑगस्ट 2020 रोजी लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे सकाळी 11.30 वा. महाविद्यालयातील शिक्षक वृंद व विद्यार्थी यांना कार्यक्रमाची लिंक पाठविण्यात आली.त्यानुसार सर्वांनी मा. मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांचे हस्ते सुरू झालेल्या कार्यक्रमात सहभागी झाले. कार्यक्रम अतिशय उत्तम प्रकारचा होता.बऱ्याच दिवसांनंतर असा कार्यक्रम झाल्याचे समाधान सर्वांनी व्यक्त केले. समाजशास्त्र विभागप्रमुख तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. मिलिंद जांभुळकर यांनी या कार्यक्रमाचे संदर्भात सगळ्यांना माहिती पुरविली. या कार्यक्रमात लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वरील चित्रफीत देखील सर्वांनी बघितली. शिवाय सर्व मान्यवरांचे मनोगत देखील ऐकले. दोघांच्याही जीवनावरील दिलेले व्याख्यान खरोखरच छान होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here