वैद्यकीय कामा साठी परगावी जाणाऱ्यांना कोरोन्टीन करू नये !

0
289

 

वैद्यकीय कामा साठी परगावी जाणाऱ्यांना कोरोन्टीन करू नये !

प्रहारचे रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे मागणीला जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिसाद !

अनंता वायसे हिंगणघाट तालुका प्रतिनिधी 9850833516

हिंगणघाट
येथील अनेक नागरिक हे वैद्यकीय उपचारासाठी नागपूर येथे जात असतात.परंतु एका दिवसात जाऊन वापस येणाऱ्याना संस्थात्मक कोरोन्टीन करण्याच्या शासकीय अधिकाऱ्यांच्या तुघलकी निर्णया मुळे अनेक रुग्णावर मोठेच संकट कोसळलेले आहे.त्यामुळे कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारावर उपचार घेण्यासाठी जाणाऱ्या रुग्णावर कोरोटाइनची सक्ती करू नये अशी आग्रहाची विनंती वजा मागणी प्रहारचे पूर्व विदर्भ प्रमुख रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांनी एका निवेदनातून जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांचेकडे एका निवेदनातून केली होती.
सदर मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी याबाबत जिल्हा माहिती अधिकारी यांचे मार्फत प्रेसनोट काढून ही मागणी मान्य केली होती.परंतु हा आदेश लेखी नसल्याने स्थानिक पातळीवर अधिकारी वैधकीय कारणसाठी बाहेरगावाहून आलेल्या रुग्णाला कोरोटाईन करण्याचा आग्रह करीत होते.
याबाबत पुन्हा अनेक नागरिकांनी प्रहारचे गजुभाऊ कुबडे यांचेकडे तक्रार केली असता त्यांनी लेखी आदेश काढण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे सतत पाठपुरावा केला.अखेर गजुभाऊ कुबडे यांच्या विनंतीला प्रतिसाद देत मा जिल्हाधिकारी विवेक भीमनावर यांनी आज 1 आगस्टला लेखी आदेश काढल्याने अनेक गरजू रुग्णांना दिलासा मिळालेला आहे.
शहर व ग्रामीण भागातील हजारो नागरिक हे विविध आजाराने त्रस्त आहेत.कॅन्सर,मूत्रपिंड, मूळव्याध,बीपी, मधुमेह,व असंख्य आजाराच्या उपचारासाठी नियमितपणे नागपूर येथील विविध डॉक्टर कडून उपचार घेत असतात.काही रुग्ण हे खासगी वाहन करून व ई- पास घेऊन नागपूरला जातात जातांना येताना नागपूर-वर्धा जिल्ह्यातील सीमा असलेल्या बरबडी येथे काही गाड्या अडवतात व गाडीचा नंबर व गाडीत असलेल्या प्रवाशांचे नाव लिहून घेतात सदर रुग्ण एकाच दिवसात उपचार घेऊन घरी आला की रात्री येथील प्रशासनाचे पथक त्या व्यक्तीच्या घरी येतात व तुम्हाला संस्थात्मक कोरोटाइन व्हावे लागेल असे सांगत.तर अनेकदा त्यांना शिक्का मारून १४ दिवस होम कोरोन्टीन करीत होते.या प्रकाराने सामान्य नागरिक धास्तावला गेलेला होता. कोरोन्टीन होण्याच्या भीतीने अनेक रुग्ण हे आपली नियमित तपासणी करू शकत नव्हते..त्यासाठी वर्धा जिल्हा प्रशासनाने वैधकीय कारणा साठी नागपूर वा अन्य गावी जाणाऱ्या रुग्णांना या त्रासदायक प्रकारातून मुक्ती दिली याबाबत अनेक रुग्णानी हा आदेश काढल्याबद्दल जिल्हाधिकारी यांचे व यासाठी सतत पाठपुरावा केल्याबद्दल प्रहारचे गजुभाऊ कुबडे यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here