हिंगणघाट येथील अरिहात क्रिटिकल सेंटर व मरोठी हॉस्पिटलला क्षमतेनुसार ३० ते ३५ बेडची कोविड सेंटर म्हणून परवानगी द्या- माजी आमदार प्रा. राजु तिमांडे

0
532

हिंगणघाट येथील अरिहात क्रिटिकल सेंटर व मरोठी हॉस्पिटलला क्षमतेनुसार ३० ते ३५ बेडची कोविड सेंटर म्हणून परवानगी द्या- माजी आमदार प्रा. राजु तिमांडे

१० रुग्णांच्या इलाजासाठी परवानगी दिली असून हॉस्पिटलच्या क्षमतेनुसार ३० ते ३५ बेडची वाढीव परवानगी देण्याची मागणी

हिंगणघाट,अनंता वायसे (१९ एप्रिल) : अरिहंत क्रिटिकल सेंटर व मराठी हॉस्पिटल हिंगणघाट क्षमतेनुसार ३० ते ३५ बेडची कोरोना सेंटर म्हणून परवानगी देण्याबाबत माजी आमदार प्रा.राजु तिमांडे ज्यांनी जिल्हाधिकारी वर्धा यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
कोविडचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून हिंगणघाट येथे अरिहंत क्रिटिकल सेंटर व मरोठी हॉस्पिटलला १० रुग्णांच्या इलाजाची परवानगी दिली आहे.
या हॉस्पिटलमध्ये ३० ते ३५ बेडची जादाची व्यवस्था होऊ शकते तसेच डॉ. मरोठी यांच्याकडे डॉक्टर, नर्सिंगच्या मुले-मुली व इतर सोयी उपलब्ध आहे. तरी आपण कोविडच्या रुग्णांच्या सोयीसाठी जादा ३० ते ३५ बेडची परवानगी देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी जिल्हाधिकारी कडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here