पैनगंगा वेकोलीकडून विरूर गाडेगाव येथे प्रकल्पग्रस्तांना तुटपुंजी मदत

0
470

पैनगंगा वेकोलीकडून विरूर गाडेगाव येथे प्रकल्पग्रस्तांना तुटपुंजी मदत

योग्य मोबदला मिळण्यासाठी नागरिकांची मागणी
प्रवीण मेश्राम । कोरपना तालुक्यातील विरूर गाडेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणारी जवळपास संपुर्ण मालमत्ता पैनगंगा वेस्टर्न कोल फील्डने संपादन केली आहे.त्यावेळी तेथील कित्येक घर व प्लॉट धारकांना ३ लाख रुपये अशाप्रकारे सरसकट अनुदान दिल्याची माहिती असून आता मात्र वेकोली यातील काही खाली प्लॉटांची अतिशय तुटपुंजी किंमत देणायत येत असल्याने सदर प्लॉट धारकारमध्ये संतापाची लाट उसळली आहे.पुनर्वसित गावात वेकोली प्रशासनाने घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी किंवा प्लॉटनांचा पूर्वीप्रमाणेच योग्य मोबदला द्यावा,तुटपुंजी किंमत देऊन थट्टा करू नये,जागा संपादित करू देणार नाही,यासाठी वेळप्रसंगी आंदोलन,उपोषण असे संवैधानिक मार्ग अवलंबविण्यात येईल असा इशारा मारोती पिंपळकर,गोसाई गैखरे,रवी करमरकर,मोतीराम करमरकर या जागा धारकांनी दिला आहे.
सविस्तर असे की, विरुर गाडेगाव येथील पैनगंगा कोळसा खाणी करिता परिसरातील तेथील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी वेकोलीने संपादित केल्या आणि त्याचा मोबदला ही त्यांना देण्यात आला व ग्रामपंचयत विरुर (गाडे) चे पुनर्वसनास २०१८ – १९ मध्ये सुरवात झाली त्यापैकी गावातील ४०४ कुटुंबाचे पुनर्वसन धारक कुटुंबापैकी जवळपास ८०% टक्केच पुनर्वसन झाले असून २० % कुटुंब अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे पुनर्वसनाच्या अनुषंगाने ग्रामसभेचा ठराव घेऊन घेण्यात आला होता ठरावानुसार ४०४ कुटुंबापैकी तीनशे हुन अधिक कुटुंबाना रकमेच्या स्वरूपात मोबदला देण्यात आला आणि ते गाव सोडून बाहेर गावाला निघून गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here