इम्पॅक्ट चा इम्पॅक्ट!!!
इम्पॅक्ट २४ न्यूज च्या वृत्ताची दखल घेत नगर परिषद प्रशासनाने केली नालीसफाई

राजुरा(चंद्रपूर) : ३१ मार्च ला इम्पॅक्ट २४ न्यूजने नाली व रस्त्याची दुरावस्था नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष, नालीसफाई करण्याची नागरिकांची मागणी या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेत आज सकाळी २ एप्रिलला प्रशासनाकडून शिवाजीनगर परिसरातील मुख्य नालीची साफसफाई करण्यात आली.
शिवाजीनगर वार्डात नालीत बाटल्यांचा खच पडून सांडपाणी वाहण्यास अडचण निर्माण होत होती. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्य समस्येला खुले निमंत्रण ठरत होते. नगरसेवकांना याची कल्पना देऊनही काही उपाययोजना करण्यात आल्या नाहीं म्हणुन नागरिकांत रोष दिसत होता. हि बाब इम्पॅक्ट ने नगर परिषद राजुरा यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर तातडीने सदर वृत्ताची दखल घेत नालीची साफसफाई करण्यात आली.