वेकोलीच्या क्षेत्रीय योजना अधिकारी पुलय्या वर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून सेवेतून बडतर्फ करा! आशा घटे आत्महत्या प्रकरणी राजुरा तेली समाजाची मागणी

0
362

वेकोलीच्या क्षेत्रीय योजना अधिकारी पुलय्या वर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून सेवेतून बडतर्फ करा!

आशा घटे आत्महत्या प्रकरणी राजुरा तेली समाजाची मागणी

राजुरा (ता.प्र.) 1 एप्रिल : स्वर्गीय आशा तुळशीराम घटे वय वर्षे १९ हिला आत्महत्येला प्रवृत्त केल्यामुळे व तिने त्या कारणामुळे आत्महत्या केल्यामुळे वेकोलीच्या क्षेत्रीय योजना अधिकारी पुलय्या वर आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करा. कायदेशीर कारवाई करून सदर अधिकाऱ्यास सेवेतून बडतर्फ करण्याबाबत तक्रार अर्ज / निवेदन तेली समाज राजुरा च्या वतीने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे यांना आज देण्यात आले.

पाषाणहृदयी, माणुसकीला काळिमा फासून कलंकित करणारे, पात्रतेवर संशय घेणे, शेतकरी मुलांना कवडीतुल्य समजणे, हिन वागणूक देणे, अगदी खालच्या स्तराचा वापर करून मानसिक दबाव टाकून पिळवणूक करत पैसे लाटणे,

काल कुटुंबियांकडून गुन्हा दाखल करून सुद्धा वेकोली प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून सोयीस्कर पाठराखण करून दुर्लक्ष केल्याने अजूनपर्यंत कोणतीही कारवाई सदर अधिकाऱ्यावर करण्यात आलेली नाही. परिसरातील लाभार्थी शेतकरी अपत्यांना या विकृत प्रवृत्तीचा सामना करावा लागत आहे. आर्थिक लोभापोटी मिळणाऱ्या हिन वागणुकीने एक नाहक बळी गेला आहे. हा दयनीय प्रकार रोखण्यासाठी वेकोली प्रशासनाने भानावर येऊन तातडीने कारवाई करत तात्काळ निलंबन करून कठोर कारवाई करणे आवश्यक झाले आहे. तरच अशा प्रवृत्तीला आळा बसेल व भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही.

सविस्तर वृत्त असे की, सास्ती येथील मय्यत कु. आशा तुळशिराम घटे यांच्या वडीलाची शेती वे.को.ली. मार्फत संपादीत करण्यात आली होती. त्या अनुषंगाने मय्यत कु. आशा घटे ही वेकोली मार्फत लाभार्थी असल्यामुळे तिच्या नौकरीसाठी मय्यत ही तिचे नातेवाईका सोबत धोपटाळा येथील वेकोली कार्यालयात दि. २२.०३.२०२१ रोजी नौकरीसाठीचे सर्व दस्ताऐवज घेवून गेली होती. नौकरीबाबतचे वेकोली कडील काम हे पुलय्या करतात. त्यादिवशी जी. पुलय्या यांनी मय्यत कु. आशा घटे हिला अपमानास्पद वागणुक दिली. त्यामुळे मय्यत कु. आशा घटे हिच्या मनावर परिणाम झाला. त्याकारणामुळे तिने सास्ती येथे घरी येवून सदर अधिकाऱ्याने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यामुळे विष प्राशन केले. त्यानंतर दि. ३१.०३.२०२१ रोजी तिचे चंद्रपूर येथे दुखद निधन झाले.

मय्यत कु. आशा घटे यांच्या परीवारातील सदस्यांनी सदर अधिकाऱ्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार राजुरा पोलीसांनी या अधिकाऱ्या विरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही.

कु. आशा तुळशिराम घटे हिला मनस्ताप दिलेला असून तिचेवर दबाव टाकलेला होता व वाईट वागणुक दिली. या कृत्यामुळे कु. आशा तुळशिराम घटे हिने आत्महत्या केलेली असून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा गुन्हा केलेला आहे. त्यामुळे त्या पाषाण ह्रदयी लालसी अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई होणे आवश्यक झालेले आहे.

पिडीत मय्यत आशा घटे ही तेली समाजाची युवती असल्यामुळे तिला व तिच्या परिवारातील लोकांना न्याय मिळावा म्हणून समाजबांधव या नात्याने तेली समाजाचे वतीने प्रस्तुत लेखी तकार तसेच निवेदन दाखल करण्यात आले आहे. करीता लेखी तक्रार करण्यात येत आहे अशी माहिती दिली आहे. या निवेदनाची प्रतिलिपी कोळसा मंत्री, भारत सरकार, नई दिल्ली, पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर, खासदार बाळुभाऊ धानोरकर, राजुरा आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी चंद्रपूर, पोलीस अधिक्षक चंद्रपूर, उपविभागीय अधिकारी राजुरा, तहसिलदार राजुरा, उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा आदींना समस्त तेली समाज राजुराचे वतीने देण्यात आले.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here