ठेकेदार व ग्रामपंचायतच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचा 50 हजार रुपयांचा गुरांचा चारा जळून खाक
पाटागुडा : चिखली खुर्द अंतर्गत पाटागुडा गावात ग्रंथालयाच काम सुरू आहे हे काम एका ठेकेदार यांच्या माध्यमातून होत आहे. काल सायंकाळी ग्रंथालयाच काम करीत असताना जवळील इलेक्ट्रॉनिक तारांवर बेकायदेशीर लाईट टाकून काम सुरू होते. या ठेकेदारांच्या निष्काळजीपणा मुळे ठेकेदारांनी सकाळी बेकायदेशीर जवळील विद्युत तारांवर आकडा टाकलेले तार काढले नाही. या तारांच्या शॉर्ट सर्किट होऊन शेतकऱ्यांचा गुराचा चारा जळून खाक झाला आहे. अधिच शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला असून ठेकेदार व ग्रां पंचायत चा हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांने वर्षभरासाठी गुरांच्या पोटापाण्यासाठी जमा केलेला चारा जळून खाक झाल्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. तहसिलदार साहेबांनी तसेच महावितरण कंपनीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांला आर्थिक मदत मिळवून देण्याकरिता मदत करावी व दोषी ठेकेदार व ग्रामपंचायत चिखली खुर्द यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
