हाेळीसाठी चंद्रपूरची बाजारपेठ सजली पण ग्राहकांची गर्दीच नाही, व्यापारी ग्राहकांच्या प्रतिक्षेत
🟪किरण घाटे🟥दरवर्षी साजरा हाेणारा हाेळी सण या वर्षी देखिल अवघ्या दाेन दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यानिमित्ताने अवघी चंद्रपूरची बाजार पेठ सजली पण काेराेना महासंकटामुळे बाजार पेठेत ग्राहकांची दरवर्षी राहणारी गर्दी या वेळेस नसल्याची खंत अनेक व्यापा-यांनी या प्रतिनिधीशी बाेलतांना व्यक्त केली .गेल्या एक आठवड्यांपासून स्थानिक बाजारपेठ विविध रंगासह पिचक-यांनी सजली असल्याचे चित्र बाजाराचा फेरफटका मारला असता आज द्रूष्टीक्षेपात पडले गाेल बाजारात गाठी विक्रेत्यांची दुकाणे थाटली असुन या वर्षी गाठींच्या किंमतीत एका किलाे मागे विस ते ३०रुपयांनी वाढ झाली असल्याचे एका व्यापा-याने भेटी दरम्यान सांगितले .रंगपंचमी करीता माेठ्यांसह बच्चे कंपनीकरीता छाेटा भिम , माेटु पतलु , व नाेबिता यांचे छायाचित्र असलेल्या पिचक-या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या असल्या तरी म्हणावी तशी ग्राहकांची गर्दी सजलेल्या बाजारपेठेत दिसून आली नाही .एकंदरीत ग्राहकांनी बाजारपेठे कडे पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसून येते .मागिल वर्षि मार्च महिण्यांतच महाभयानक काेराेना उद्रेक झाला हाेता या वर्षि तिच परिस्थिती आहे शहरात दिवसागणिक काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे .आनंदात साजरी हाेणारी यंदाची रंगपंचमी रंगाविना हाेते की काय अशी भीती व्यापा-यांसह नागरिकांत व्यक्त केल्या जात आहे .काेराेना संकटामुळे अनेक व्यापा-यांनी सावधगिरी बाळगत हाेळी व रंगपंचमीसाठी उपयाेगात येणारे साहित्य व वस्तु कमी प्रमाणात नागपूर येथून बाेलविले असल्याचे समजते पण त्या ही वस्तुंची विक्री हाेते की नाही अशी शंका आता बाजारपेठेतील गर्दी पाहता त्यांचे मनात निर्माण झाली आहे .सध्या तरी व्यापारी ग्राहकांच्या प्रतिक्षेत आहे! हे मात्र तेवढेच खरे आहे! 🟣🟢शहरी विभागा प्रमाणेच ग्रामीण भागातही हाेलीकाेत्सव आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यांत येताे परंतु तेथेही काेराेनाने या वर्षात त्यांचे आनंदावर विरजन पाडले जरी असले तरी चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्या अंतर्गत येत असलेल्या राजाेली येथील तरुण युवक मंडळी व गावातील बच्चे कंपनी दिवसभर घानमाकड वर बसुन मनमुराद आनंद घेत असल्याचे चित्र माेठ्या प्रमाणात दिसून येते .अलीकडे ग्रामीण भागात घानमाकडचे प्रमाण घटले आहे हे मात्र विशेष !