राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली वतीने निदर्शने
परमवीर सिंगावर शिस्तभंगाची कार्यवाही करा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी

आज इंदिरा गांधी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने परमवीर सिंग यांच्या विरोधात निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला.परमबीर सिंग यांचे स्थानांतरण होमगार्ड महासंचालक पदी नियुक्ती झाल्यानंतर राज्याचे कर्तव्यदक्ष गृहमंत्री श्री.मा.ना.अनिल बाबु देशमुख यांच्या वर खोटे आरोप करून विरोधी पक्ष हाताशी धरून राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासवळण्याचे काम केलेले आहे.त्यांच्या सेवाशर्ती नुसार हे कायदयाने अमान्य आहे महणून आज राष्ट्रवादी काँग्रेस कडून परमबीर सिंगावर शिस्तभंगाची कार्यवाही करुन त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. त्याचबरोबर परमबीर सिंगाना साथ देणारे विरोधी पक्ष नेते मा.देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा निषेध करण्यात यावेळी टरबूज फोडून निषेध करण्यात आले..
यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष रवींद्रजी वासेकर,जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये जिल्हा सचिव संजय कोचे जिल्हा सरचिटणीस, जगन जांभुळकर सोनाली ताई पुण्यपवार नागूपर विभागीय सचिव, प्रभाकर जी बारापात्रे सेवादल अध्यक्ष, प्रमिला रामटेके जिल्हाअध्यक्ष सा. न्याय. विभाग, विनायक झरकर अध्यक्ष ओ. बी. सी.विभाग, इंद्रपाल गेडाम उपाध्यक्ष सा. न्याय. विभाग, विवेक बाबनवाडे तालुका अध्यक्ष,अशोक जी बोहरा तालुका उपाध्यक्ष, विजय धकाते शहर अध्यक्ष, कपिल बागडे शहर उपाध्यक्ष, मनीषा ताई खेवले महिला शहर अध्यक्ष, हबीब खाँ.पठाण,धनराज भांडेकर, रोशन राऊत, मलय्या कालवा,निलीमाताई बोलीवार , सुशिल मामीडवार, मनोरमा गर्हाटे, सत्वशील खोब्रागडे, शैलाताई कातकर, महबुब पठाण, अँड.सलीम मनसुरी,रजिया पठान ,गुलाम जाफर शेख, विद्या सिडाम, मंगला सिडाम तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते…