नवी दिल्ली येथील इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन च्या परभणी शहर अध्यक्षपदी मयूर चंद्रकांतराव मोरे (देशमुख) यांची निवड

0
404
नवी दिल्ली येथील इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन च्या परभणी शहर अध्यक्षपदी मयूर चंद्रकांतराव मोरे (देशमुख) यांची निवड

परभणी येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रा मध्ये सदा अग्रेसर असलेले तरुण तडफदार युवा नेते,सा. जन आक्रोश संपादक मयूर चंद्रकांतराव देशमुख याची आंतरराष्ट्रीय पातळीवर पत्रकारचे संघटन असलेल्या नवी दिल्लीच्या इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या परभणी महानगर अध्यक्षपदी निवड आली.
इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय कुमार कोठेजा , महाराष्ट्र वुमेन्स विंगच्या राज्य संघटक सचिव श्रीदेवी पाटील , इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन चे मराठवाडा कार्याध्यक्ष धाराजी भुसारे , इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन  परभणी जिल्हा अध्यक्ष मदनजी कोल्हे , इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन  हिंगोली जिल्हा अध्यक्ष उत्तम धारजे या मान्यवरच्या हस्ते या बाबतचे निवडीचे पत्र आणि ओळख पत्र देण्यात आले.
परभणी येथील राजकीय , सामाजिक क्षेत्रात तरुण , तडफदार आणि धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणून गेल्या काही वर्षांपासून पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणारे मयूर चंद्रकांतराव मोरे (देशमुख) यांचे नाव घेतले जाते .
मयूर मोरे यांनी पत्रकारितेची सुरुवात साप्ताहिक जन आक्रोश मधून 2017 पासून सुरु केली असून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या बाबींना प्रकाशात आणण्याचे काम आपल्या जन आक्रोश या वृत्तपत्राच्या माध्यमातून करत आहेत . आपल्या पेपर च्या माध्यमातून समाजात पर्यावरण संरक्षण महत्व वाढावे व नवोदित साहित्यिकांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी नेहमीच केले .
विविध संघटनांच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने आंदोलने करून मोर्चे काढून अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे, अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. (NSUI) नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (विद्यार्थी काँग्रेस) या संघटनेच्या ते महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून कार्यरत आहेत. या पदाला पूर्णपणे न्याय देताना मयूर मोरे यांनी संपूर्ण जिल्ह्यात आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे. जिल्ह्यातील अनेक तरुणा मधील सामाजिक भान हेरून त्यांनी या तरुणाना पुढे आणत एकत्र केलं आहे. त्यांचे सहकार्य घेत त्यांनी जिल्ह्यातील गावागावात संघटनेची पाळेमुळे रोवली आहेत. आणि याच माध्यमातून त्यांनी तळागाळातील विध्यार्थीच्या प्रश्न समजून घेऊन त्यांना वाचा फोडण्याचे, तसेच ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी मयूर मोरे यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन ही भारत सरकारच्या मान्यते प्राप्त काम करणारी, संपूर्ण भारतातील तसेच काही दिवसांपूर्वी जागतिक पातळीवर पोचलेली सर्वात मोठा पत्रकार परिवार असलेली संस्था असून पत्रकारांसाठी काम करणारी विश्वसनीय संस्था असो. या संस्थेचा नावलौकिक आहे. अशा या संस्थेच्या परभणी शहर अध्यक्षपदी श्री. मयूर मोरे (देशमुख) यांची अभिनंदनीय निवड करण्यात आली आहे. यावेळी देवानंद वाकले , अब्दुल रहीम , महमूद खान , विजय चट्टे रामेश्वर शिंदे , प्रवीण मोरे , आदी पत्रकार उपस्थिती होते .
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन या संस्थेने त्यांची परभणी शहर अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अभय देशमुख , सचिन जवंजाळ , राजपाल शिंदे तसेच सर्व क्षेत्रातून अभिनंदन वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here