ताडोबा रोड दुर्गापूर मार्गावरील पथदिवे वर्ष भऱ्यापासून बंद

0
668

ताडोबा रोड दुर्गापूर मार्गावरील पथदिवे वर्ष भऱ्यापासून बंद

मागील वर्ष भऱ्यापासून चंद्रपूर ताडोबा मार्गावरील दुर्गापूर ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे बंद अवस्थेत आहेत. सा. बां. विद्युत उपविभाग चंद्रपूर यांनी सदर स्ट्रीट लाईट चे बांधकाम माहे जून 2018 मध्ये पूर्ण करून त्याची 12 महिन्याची या विभागामार्फत करावयाची देखभाल व दुरुस्ती ची मुदत संपवून चालू अवस्थे मध्ये माहे मार्च 2020 रोजी ग्रामपंचायत दुर्गापूर ला पत्रक जारी करून हस्तांतरित करण्यात आले होते. परंतु ग्रा पं दुर्गापूर ने त्या स्ट्रीट लाईट संबंधात योग्य दखल न घेतल्याने दुर्गापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोडणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार ते अक्सिस बँक शाखा दुर्गापूर पर्यंतचे स्ट्रीट लाईट मागील 1 वर्षांपासून सतत बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे रात्रोला जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना तसेच वाटेवरील दुकानदारांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. दुर्गापूर परिसराला WCL, CSTPS ताडोबा उद्यान लागून असल्याने वाहने भरमसाठ चालतात. त्यामुळे अपघात होण्याची तसेच अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यास्तव समता सैनिक दल शाखा दुर्गापूरचे माजी अध्यक्ष संदीप देठेकर यांच्या नेतृत्वात आणि जनतेच्या सह्यानिशी स्ट्रीट लाईट चालू करण्या सांबांधने तक्रार निवेदन ग्रामपंचायत दुर्गापूर, गट विकास अधिकारी चंद्रपूर तसेच जिल्हा परिषद चंद्रपूर यांना देण्यात आले. त्या सांबांधने त्वरित कार्यवाही न झाल्यास जनता केव्हाही आंदोलन करणार हे मात्र निश्चित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here