छायाचित्र नसलेल्या मतदारांना यादीतून वगळणार…

0
473

छायाचित्र नसलेल्या मतदारांना यादीतून वगळणार…

राजुरा । राजुरा विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या निरंतर प्रक्रियेअंतर्गत राजुरा विधानसभा मतदार संघातील राजुरा, जिवती, कोरपना व गोंडपिपरी तालुक्यातील मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची चौकशी करण्यात आली. ज्या मतदारांचे कायमस्वरूपी स्थानांतरण झाले, मुलींचे लग्न झाले, मतदार यादीतील पत्त्यावर राहत नाही, मृत मतदार आदींचे पंचनामे तयार करण्यात आले आहे. यात मतदार संघातील मतदार यादीत 6053 मतदारांचे छायाचित्र नव्हते. त्यापैकी 958 मतदारांचे छायाचित्र प्राप्त झाले आहेत. उर्वरित 5095 मतदारांची यादी जिल्हाधिकारी चंद्रपूर कार्यालयाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.राजुरा-(70) मतदार संघातील यादीतून नाव वगळणे कारवाई अंतर्गत तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या पंचनाम्याची यादी तपासून बघावी. सदर यादीत ज्यांचे नाव आले असल्यास त्यांनो आपले दावे व हरकती राजुरा, जिवती, कोरपना व गोंडपिपरी तहसील कार्यालयास सादर कराव्यात. अन्यथा यादीतील नाव वगळण्याबाबत आपला आक्षेप नाही असे गृहीत धरून मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येईल. याची सर्व संबंधित मतदारांनी नोंद घ्यावी, असे मतदार नोंदणी अधिकारी, 70-राजुरा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी राजुरा यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here