नेरी नवरगाव रस्त्यावर रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅकटर च्या धडकेत एक दुचाकीस्वार जागेवरच ठार

0
526

नेरी नवरगाव रस्त्यावर रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅकटर च्या धडकेत एक दुचाकीस्वार जागेवरच ठार

नेरी नवरगाव मार्गावर नेरी येथील केवळराम कामडी यांच्या घरासमोर रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकटर आणि दुचाकी यांच्यात आज दि 20 ला 5 वाजता जोरदार अपघात झाला यात ट्रेकटरने दुचाकीस्वाराला जागीच चिरडले यात दुचाकीस्वार जागीच ठार झाले तर मागें बसलेला दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली असून त्यांना रूग्णालयात दाखल केले आहे
सविस्तर असे मोटेगाव येथील गोकुलदास मेश्राम आणि दिवाकर दडमल हे दोघे जण आपल्या दुचाकी क्रमांक एम एच 34 बी क्यू 9778 ने नेरीला कामानिमित्त येत असताना आणि नेरीवरून नदी घाटावर अवैध रेतीची तस्करी करण्यासाठी सुसाट वेगाने जात असलेले बिना नंबरचे ट्रकटर ने केवळराम कामडी यांच्या घरासमोर जोरदार धडक दिली आणि यात दुचाकी स्वार गोकुलदास मेश्राम हे जागेवरच ठार झाले तर माघे बसलेले दिवाकर दडमल याना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सदर घटना घडताच ट्रकटर चालक फरार झाला सदर बिना नंबरचे ट्रकटर हे हजारे नामक व्यक्तीचे होय असे नागरिकांत चर्चा सुरू आहे नेरी परिसरात अवैध रेती तस्करी चा अड्डा असून या परिसरातील अनेक नदी नाल्यावरून रेती तस्करी केल्या जाते महसूल विभाग अनेक कारवाया करते परंतु त्यांना सुद्धा चकमा देऊन जागोजागी माणसे ठेऊन रेतीतस्करी केली जाते आणि त्यांच्या ट्रेकटर ह्या भन्नाट वेगात असतात या अगोदर सुद्धा असे किरकोळ अपघात या रेतीतस्करामुळे झाले आहेत तेव्हा यांच्यावर जोरदार कारवाई करायला पाहिजे अशी मागणी जनतेची होत आहे जर का या रेतीतस्करावर कडक कारवाई झाली असती तर आज या अपघातात गोकुलदास मेश्राम यांचा जीव गेला नसता अशी हळहळ मोटेगाव वाशीय जनतेनी व्यक्त केली आहे
सदर घटनेची माहिती मिळताच चिमूर पोलीस स्टेशन चे पी एस आय शेख आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले प्रताचे पंचनामा करून उत्तरनिय तपासणी साठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले असून पुढील तपास सुरू आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here