मा.नगराध्यक्ष सौ.योगितताई प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते रस्ता खडीकरण बांधकामाचे भूमिपूजन

0
525

मा.नगराध्यक्ष सौ.योगितताई प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते रस्ता खडीकरण बांधकामाचे भूमिपूजन

गडचिरोली-नगर परिषदे अंतर्गत येणाऱ्या गोकुळनगर प्रभाग क्र.१२ मधील माता मंदिर चौक येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरीवस्ती सुधार योजना अंतर्गत नीलकंठ भांडेकर ते बोबाटे यांच्या प्लॉट पर्यंत रस्ता खडीकरण बांधकामाचे भूमिपूजन मा. नगराध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे यांच्या हस्ते दि. १७ मार्च रोजी करण्यात आले. सदर रस्त्याच्या कामाची अंदाजित रक्कम १२ लाख ४३ हजार ५०० रुपये एवढी असून २५० मीटर लांबीचे बांधकाम आहे.
गोकुळनगर प्रभाग क्र.१२ मध्ये मागील ४ वर्षात दलित वस्तीमधून ५ कोटींचे विकास कामे सुरू आहेत.यामध्ये सिमेंट रस्ते, सिमेंट काँक्रीट नाली बांधकाम,डाम्बरिकरण असे अनेक कामे सुरू आहेत.
-भूमिपूजन कार्यक्रमाला बांधकाम सभापती प्रवीण वाघरे,नगरसेवक प्रमोद पिपरे,नगरसेवक ऍड.नितीन उंदिरवाडे,कंत्राटदार चंद्रशेखर भुरसे,देविदास खोब्रागडे यांच्यासह वार्डातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here