जिल्हा नियोजन विकास समितीवर निवड
सुखसागर झाडे । गडचिरोली जिल्हा नियोजन विकास समितीवर गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तथा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी राज्यमंत्री विधानमंडळ सदस्यांमधुन नियुक्त नामनिर्देशित सदस्यांमध्ये मा. धर्मरावबाबा आत्राम साहेब यांची निवड करण्यात आली. तर विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते मा. ऋतुराज हलगेकर साहेब, प्रदेश संघटन सचिव युनूस शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा. रविभाऊ वासेकर यांची निवड करण्यात आली असल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
